कृपया ध्यान दे। ऑनलाईन तिकीट बुक करताय, जाणून घ्या नवे बदल

130

रेल्वे प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल आणि ट्रेनचे ऑनलाइन तिकीट काढत असाल, तर ही बातमी नक्की वाचा. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून ऑनलाइन तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांना आता मोबाईल आणि ई-मेल व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे, त्यानंतरच ऑनलाईन तिकीट काढता येणार आहे.

काय आहेत नियम?

कोरोनामुळे दीर्घकाळ तिकीट बुक न केलेल्या प्रवाशांसाठी रेल्वेने नवे नियम लागू केले आहेत. अशा लोकांना इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) पोर्टलवरून तिकीट खरेदी करण्यासाठी प्रथम मोबाईल नंबर आणि ईमेल व्हेरिफाय करुन घेणे आवश्यक आहे. त्यानंतरच प्रवाशांना तिकीट मिळणार आहे. मात्र, नियमित तिकीट काढणा-या प्रवाशांना या प्रक्रियेतून जावे लागणार नाही. आयआरसीटीसी भारतीय रेल्वे अंतर्गत ई-तिकिटांची ऑनलाइन विक्री करते. प्रवासी तिकिटांसाठी या पोर्टलवर लॉगिन आणि पासवर्ड तयार करतात आणि त्यानंतर ऑनलाइन ट्रेन बुकिंगचा लाभ घेतात. लॉगिन पासवर्ड तयार करण्यासाठी, एक ईमेल आणि फोन नंबर व्हेरिफाय करणे आवश्यक आहे.

असे करा व्हेरिफिकेशन

जेव्हा तुम्ही आयआरसीटीसी  पोर्टलवर लॉग इन करता तेव्हा, एक व्हेरिफिकेशन विंडो उघडते. आधीचे नोंदणीकृत ईमेल आणि मोबाइल नंबर त्यावर अपलोड करा. आता तुम्हाला डावीकडे एडिट आणि उजवीकडे व्हेरिफिकेशनचा पर्याय दिसेल. एडिट पर्याय निवडून तुम्ही तुमचा नंबर किंवा ईमेल बदलू शकता. नंतर व्हेरिफिकेशनचा पर्याय निवडल्यानंतर, तुमच्या नंबरवर एक ओटीपी (वन टाइम पासवर्ड) येईल. ओटीपी टाकल्यानंतर, तुमचा मोबाइल नंबर व्हेरिफाय केला जाईल. त्याचप्रमाणे ईमेलसाठीही पडताळणी करावी लागेल. ईमेलमधील ओटीपीद्वारे याची पडताळणी केली जाते.

 ( हेही वाचा: दोघांच्या भांडणात तिस-याचा लाभ; विराट, रोहीत नाही तर ‘हा’ असणार भारताचा नवा कर्णधार )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.