ट्रेनमध्ये सहज बदला तुमची सीट! स्लीपर कोचमधून एसीतही करता येईल प्रवास, जाणून घ्या रेल्वेचे नियम

रेल्वेचे जाळे संपूर्ण भारतभर पसरले आहे. सोयीचा आणि स्वस्त प्रवास म्हणून बहुतांश लोक रेल्वे प्रवासाचे नियोजन करतात. अनेकदा प्रवास करताना तुम्हाला आवडीचा बर्थ (सीट) अलॉट होत नाही किंवा आधी आपण साधी स्लिपर तिकीट काढतो त्यानंतर अचानक आपल्याला एसी कोचमधील प्रवास सोयीचा वाटतो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमची जागा अगदी सहज बदलून घेऊ शकतात. यासाठी रेल्वेने विशेष नियम बनवले आहेत. रेल्वेच्या सीट अपग्रेड करण्याच्या सुविधेबद्दल जाणून घेऊया…

( हेही वाचा : फ्रांसचा महिलांच्या सुरक्षेविषयी महत्वाचा निर्णय; बलात्काराच्या आरोपीला नाही मिळणार फ्रांसचा ऑस्कर अवॉर्ड)

प्रवासदरम्यान सीट कशी बदलून घ्याल?

  • भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी तिकीट बुकिंगचे नियम सोपे केले आहेत. जर तुम्हाला प्रवासादरम्यान बर्थ आवडला नसेल तर तुम्ही प्रवासादरम्यान तुमची सीट अपग्रेड करू शकता म्हणजेच बदलू शकता.
  • याचाच अर्थ तुम्ही स्लीपर कोचमध्ये प्रवास करत असाल तर प्रवासादरम्यान तुम्ही एसी कोचमध्ये तुमची सीट अपग्रेड करू शकता.
  • प्रवाशांना काही अतिरिक्त पैसे देऊन त्यांचे गंतव्यस्थान बदलून प्रवास करण्याचा पर्याय रेल्वे देत आहे. प्रवासादरम्यान तुम्हाला कोच बदलून हवा असल्यास तुम्हाला कोणत्याही बूथवर किंवा आरक्षण केंद्रावर जाण्याची गरज नाही.
  • तुम्हाला यासाठी रेल्वेमध्ये उपस्थित टीटीईशी संपर्क साधावा लागेल. तुम्ही टीटीईकडे सीट बदलून देण्याविषयी विनंती करू शकता. यानंतर तुम्हाला योग्य अशी जागा टीटीईकडून अलॉट करण्यात येईल.

हे लक्षात ठेवा…

  • एसी कोचमध्ये सीट मोकळी असल्यास टीटीई तुम्हाला बर्थ अलॉट करेल. सीट अपग्रेड करण्यासाठी तुम्हाला नियमांनुसार टीटीईला रोख पैसे द्यावे लागतील.
  • जर तुमच्या इच्छित कोचमध्ये बर्थ रिकामा असेल तरच तुम्हाला संबंधित कोच अलॉट केला जाईल. सर्व बर्थ आरक्षित असतील तर तुम्ही या सुविधेचा फायदा घेऊ शकत नाहीत.
  • कुठेही सीट रिकामी नसेल तर तुम्हाला आहे त्याच डब्यातून प्रवास करावा लागेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here