भारतीय रेल्वेचे जाळे संपूर्ण देशभरात पसरले आहे. भारतीय रेल्वेशी संबंधित अशा अनेक रंजक गोष्टी आहेत त्या आजही तुम्हालाही माहिती नसतील. अशाच एका भन्नाट गोष्टीबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. देशात असेही एक रेल्वे स्थानक आहे ज्याचे नाव उच्चारणे सामान्य नागरिकांना अतिशय कठिण वाटतं हे स्थानक नेमके कुठे आहे पाहूयात…
( हेही वाचा : राजधानी ट्रेनच्या जेवणाबाबत रेल्वेकडे आल्या ६,३६१ तक्रारी; प्रवाशांच्या सेवेसाठी आता करणार विशेष उपाययोजना)
रेल्वे स्थानकाच्या इंग्रजी नावात २८ अक्षरे
वेंकटनरसिंहराजूवारीपेटा हे भारतातील सर्वात मोठ्या रेल्वे स्थानकाचे नाव आहे. या रेल्वे स्थानकाच्या इंग्रजी नावामध्ये (Venkatanarasimharajuvaripeta) तब्बल २८ अक्षरे आहेत. हे संपूर्ण नाव उच्चारण्यास सोपे जावे यासाठी स्थानिक लोक या नावाची फोड करून वेंकटनरसिंह राजुवरीपेट या नावानेही या स्थानकाला संबोधतात. वेंकटनरसिंहरराजूवारीपेटा हे रेल्वे स्थानक आंध्र प्रदेशामधील चित्तूर जिल्ह्यात तामिळनाडूच्या सीमेवर स्थित आहे.
सर्वात लहान नाव असलेले रेल्वे स्थानक
सर्वात लहान नाव असलेल्या रेल्वे स्थानकाबद्दल जाणून घ्या. या स्थानकाचे नाव इब असे आहे. ओडिशातील झारसुगुडा येथे असलेले इब (IB) रेल्वे स्थानक फक्त दोन अक्षकांपुरते मर्यादित आहे. या स्थानकावर फक्त २ फलाट आहेत. गाड्यांचा थांबा सुद्धा य स्थानकावर फक्त २ मिनिटांचा असतो.
Join Our WhatsApp Community