भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना नेहमीच उत्तमोत्तम सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. त्यामुळे आरामदायी प्रवासासाठी गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वच जण भारतीय रेल्वेला पसंती देतात. रेल्वे प्रवासाच्या तिकीटाची रक्कम ही खिशाला परवडणारी असल्यामुळे अनेक जण लांबच्या प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य देत असतात.
पण या स्वस्त दरांतील तिकीटांमागे मोठं कारण आहे. प्रवाशांच्या रेल्वे भाड्यापैकी अर्ध्याहून अधिक रक्कमेचा खर्च हा भारतीय रेल्वेकडून करण्यात येत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीच याबाबतची माहिती दिली आहे.
(हेही वाचाः सप्टेंबर नंतर क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे व्यवहार करण्यासाठी द्यावा लागणार ‘हा’ नंबर, RBI चा निर्णय)
62 हजार कोटी रुपयांचा खर्च
रेल्वे प्रवाशांच्या एकूण प्रवास भाड्यावर रेल्वेकडून अनुदान देण्यात येते. त्यामुळे रेल्वेचे तिकीट प्रवाशांना रास्त दरात उपलब्ध होते. या अनुदानावर रेल्वे मंत्रालयाने या वर्षी तब्बल 62 हजार कोटी रुपयांचा खर्च केल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
55 टक्क्यांहून अधिकची सवलत
रेल्वे प्रवासी भाड्यावर 55 टक्क्यांहून अधिक रक्कमेची सवलत ही रेल्वेकडून देण्यात येते, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. भारतीय रेल्वेला प्रवाशांचा जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावा यासाठी रेल्वेकडून असे प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community