लांबच्या प्रवासासाठी प्रवासी प्रामुख्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांना पसंती देतात. आरामदायी प्रवासासाठी प्रवासी प्रामुख्याने रात्रीच्या प्रवासाला प्राधान्य देतात. याच रात्रीच्या प्रवासाबाबत आता भारतीय रेल्वेकडून नवीन नियम जारी करण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी आणि शांततापूर्ण होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
अशी आहेत बंधने
रात्रीच्या वेळी प्रवास करताना काही प्रवाशांकडून अनेकदा मोठमोठ्याने गप्पा किंवा मोबाईल आणि इतर साधनांवर मोठ्या आवाजात गाणी किंवा सिनेमा लावला जातो. इतकंच नाही तर फोनवर गप्पाही मारल्या जातात. प्रवाशांच्या या वागण्यावर आता भारतीय रेल्वेकडून बंधने घालण्यात आली आहेत. प्रवासादरम्यान रात्री 10 नंतर प्रवासी फोनवर मोठमोठ्याने गप्पा मारू शकत नाहीत. तसेच मोठ्या आवाजात गाणी ऐकण्यावर देखील रेल्वे प्रशासनाकडून बंधने घालण्यात आली आहेत. या कारणांमुळे अन्य प्रवाशांच्या झोपेचं खोबरं झालं तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देखील रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
ट्रेन में रात को तेज म्यूजिक सुनने या शोर-शराबा करने पर कार्रवाई हो सकती pic.twitter.com/SSjrfXK9NM
— North Western Railway (@NWRailways) January 21, 2022
(हेही वाचाः 500 पेक्षा 200 ची नोट झाली महाग, RBI ची धक्कादायक माहिती)
प्रवाशांवर प्रशासनाचे लक्ष
तसेच रात्रीच्या प्रवासात अनेकदा प्रवासी ट्रेनमधील नाईट लँप सोडून इतर सर्व लाईट चालू ठेवतात. तसेच मोठ्या आवाजत गप्पा देखील मारतात. अशा प्रवाशांवर आता रेल्वे प्रशासनाचे लक्ष असणार आहे, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
प्रवास आरामदायी करण्यासाठी निर्णय
रेल्वे प्रशासन आणि मंत्रालयालाकडे प्रवाशांकडून याबाबत वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या. या सर्व तक्रारी लक्षात घेऊन प्रवाशांचा प्रवास हा शांततापूर्ण आणि आरामदायी व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः आता Gift देणं पडणार महाग कारण…)
Join Our WhatsApp Community