‘रेलयात्री ध्यान दे’! आठवडाभर ६ तास बंद राहणार रेल्वे आरक्षण; जाणून घ्या कारण

तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल आणि रेल्वेसाठी तिकीट बुक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. कारण येत्या आठवड्याभरासाठी रेल्वे प्रवाशांची थोडी गैरसोय होणार असल्याचे समजतेय. भविष्यात प्रवासी सेवा सामान्य करण्यासाठी प्रवासी आरक्षण सिस्टिम (पीआरएस) मध्ये काही बदल करण्यात येणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने रविवारी जाहीर केले. रेल्वेकडून डेटा अपग्रेडेशनसाठीची मोठी प्रक्रिया हाती घेण्यात आल्याने संपूर्ण आठवडाभर रेल्वेचे पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टिम बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कालावधीत तिकीट आरक्षण करण्यासाठी प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

आठवडाभर आरक्षण बंद राहणार

भारतीय रेल्वेची पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टिम (Passenger Reservation System) ही येत्या काही कालावधीसाठी सहा तासांसाठी बंद राहणार आहे. येत्या आठवड्याभरासाठी ही सिस्टिम बंद राहणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून असे सांगण्यात आले की, कोरोनापूर्वीच्या वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यासाठीच हा बदल करण्यात येणार आहे. त्यामुळेच रेल्वे प्रवाशांना या कालावधीत तिकिट आरक्षण करता येणार नाही. सिस्टिम डेटा अपग्रेडेशनसाठीचा हा पुढाकार घेतल्याचेही रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

आरक्षण व्यवस्था कधीपासून होणार बंद?

रेल्वे मंत्रालयाच्या मते, पीआरएस सिस्टिम 14 आणि 15 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून बंद सुरू होणार असून 20 आणि 21 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत सुरू राहील. या दिवशी दररोज रात्री सहा तास आरक्षण व्यवस्था बंद राहणार आहे. रात्री 11.30 ते पहाटे 5.30 या वेळेत प्रवाशांना तिकीट आरक्षण करता येणार नाही किंवा लगेच बुकिंगही करता येणार नाही. याशिवाय तिकीट रद्द करणे आणि चौकशी सेवांसह इतर अनेक सुविधा बंद करण्यात येणार आहेत. पीआरएस सेवा वगळता इतर सर्व सेवा कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू राहणार आहे.

(हेही वाचा – ‘एसटी’नंतर ‘बेस्ट’च्या विलिनीकरणाची मागणी; ‘बेस्ट’ची चाकंही थांबणार?)

कोरोनापूर्व काळाचा मोठ्या प्रमाणातील जुन्या ट्रेनचा डेटा आणि सध्याचा पॅसेंजर बुकिंगचा मेल तसेच एक्सप्रेस ट्रेनचा डेटा अपडेट करण्याचे उदिष्ट रेल्वेसमोर आहे. या कारणाने ही संपुर्ण प्रक्रिया काळजीपूर्वक पद्धतीने करणे गरजेचे आहे. काळजीपूर्वक अशा पद्धतीने रात्रीच्या वेळेत ही संपूर्ण प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे रेल्वेकडून सांगितले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here