Indian School of Business : इंडियन स्कूल ऑफ बिझिनेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी किती शुल्क भरावे लागते

Indian School of Business : हैद्राबाद आणि मोहालीमध्ये आयएसबीची दोन मोठी कॅम्पस आहेत.

56
Indian School of Business : इंडियन स्कूल ऑफ बिझिनेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी किती शुल्क भरावे लागते
  • ऋजुता लुकतुके

इंडियन स्कूल ऑफ बिझिनेस ही भारतातील एक आघाडीची शैक्षणिक संस्था आहे. २००१ मध्ये रजत गुप्ता आणि अनिल कुमार यांनी संस्थेची स्थापना केली आहे. विविध स्नातकोत्तर व्यवस्थापन शास्त्राचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम इथे चालवले जातात. संस्थेत ६८ जगभरातील विद्यापाठांत कामाचा अनुभव असलेले शिक्षक आहेत. आणि संस्थेची मोहाली आणि हैद्राबादमधील दोन कॅम्पस २६० एकरवर वसलेली आहेत. (Indian School of Business)

रजन गुप्ता आणि अनिल कुमार दोघं मॅकेन्सी आणि कंपनीत उच्चपदावर होते. तिथेच दोघांचे विचार जुळले. आणि त्यांनी आयएसबी स्थापनेचा निर्णय घेतला. दोघांनी संस्थेची स्थापना करतानाच व्हॉर्टन आणि केलॉग या संस्थांशी आधीच सहकार्य करार केले होते. मॅकेन्सीमधील गुप्ता आणि कुमार यांचा कनिष्ठ सहकारी प्रमथ सिन्हा यांना डीन होण्यासाठी त्यांचं मन वळवलं. सिन्हा यांनी मॅकेन्सी कंपनीकडून सुटी घेऊन ते संस्थेत रुजू झाले आणि पुढे ते इथेच राहिले. (Indian School of Business)

(हेही वाचा – Manufacturing Companies in India : देशातील अव्वल १० उत्पादन क्षेत्रातील कंपन्या कुठल्या?)

तेव्हाच्या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी इंडियन स्कूल ऑफ बिझिनेस स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिला. २००१ साली हैद्राबाद कॅम्पसची मूहूर्तमेढ रोवली गेली तेव्हा तेव्हाचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी संस्थेच्या उद्घाटनाला हजर होते. २०१० मध्ये पंजाब सरकारने दिलेल्या जमिनीवर मोहालीतील कॅम्पसही उभा राहिला. या संस्थेत पब्लिक पॉलिसी, ॲनालिटिकल फायनान्स, इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट आणि फॅमिली एंटरप्राईज या चार विषयातील विविध स्नातकोत्तर अभ्यासक्रम इथं चालवले जातात. (Indian School of Business)

याशिवाय काही अभ्यासक्रम ऑनलाईनही चालवले जातात. स्नातकोत्तर अभ्यासक्रमासाठी २०२४-२५ या वर्षासाठीचं शुल्क ४१,७८,००० रुपये इतका निर्धारित करण्यात आलं आहे. हे शुल्क शैक्षणिक शुल्क, अभ्यासाचं इतर साहित्य, नोट्स आणि कॅम्पसमध्ये राहण्या, जेवण्याचा खर्च यासाठी आहे. आयएसबी संस्थेचे विविध आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी सहकार्य करार झाले आहेत आणि त्यामुळे इथं शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांमध्ये शिकण्याची आणि इंटर्नशिप करण्याची संधी मिळू शकते. या संस्थेत आतापर्यंत १८,००० च्या वर विद्यार्थी शिकून गेले आहेत. संस्थांसाठी व्यवस्थापन शास्त्राचे अभ्यासक्रमही इथं मागणीनुसार भरवले जातात. (Indian School of Business)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.