भारतातील हे निसर्गरम्य ‘बांबू हाऊस’ एकदा बघाच!

142

तुम्हाला हिरव्यागार ठिकाणी बांबूच्या घरात राहायला आवडेल का? आता या निसर्गरम्य बांबू हाऊसचा आनंद तुम्ही सुद्धा घेऊ शकता. ईशान्य प्रदेशात इको-टूरिझमला चालना देण्यासाठी त्रिपुरात बांबू गाव तयार करण्यात आले आहे. पश्चिम त्रिपुराच्या कटलामारा येथे भारत-बांग्लादेश सीमेवर बांबू गावाची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी बांबू वास्तुविशारद-तज्ञ मन्ना रॉय यांच्या नेतृत्वाखाली तरुणांनी सुमारे ९ एकर जमीन विकसित केली आहे. अहवालानुसार, ते आधीच देशभरातील पर्यावरणवादी आणि परदेशी लोकांसह अनेक पर्यटकांना आकर्षित करण्यात यशस्वी झालेले आहे.

Bamboo

बांबूच्या १४ पेक्षा जास्त प्रजाती

या बांबू गावात योग केंद्र, खेळाचे मैदान, वनस्पती, प्राणी, तलाव, बांबू पूल मार्ग, बांबू कॉटेज, विविध इको-फ्रेंडली सुविधा देखील उपलब्ध आहेत. तसेच बांबूच्या १४ पेक्षा जास्त प्रजाती येथे अस्तित्वात आहेत. याचा संदर्भ देत वास्तुविशारद रॉय पुढे म्हणाले की, बांबू गावात लवकरच एक संग्रहालय उभारले जाईल, जिथे बांबूपासून बनविलेले सर्व प्रकारचे जुने आणि नवीन साहित्य प्रदर्शित केले जाईल.

Bamboo 1

( हेही वाचा : सरकारी नोकरी अपडेट! ‘या’ विभागात होणार ‘२७७६’ पदांची भरती! )

जागतिक दर्जाचे इको टुरिझम हब

बांबू गाव विकसित करण्यामागील मुख्य कल्पना म्हणजे निसर्गाला बाधा न आणता स्थानिक आणि ग्रामीण संसाधनांचा योग्य आणि प्रभावीपणे वापर करणे. आतापर्यंत गावाच्या विकासासाठी ६० लाख रुपये गुंतवले आहेत, आणि सरकार किंवा कोणत्याही बँकेकडून पैसे घेतलेले नाहीत. असेही बांबू वास्तुविशारद-तज्ञ मन्ना रॉय यांनी स्पष्ट केले आहे. स्थानिक पातळीवर उपलब्ध संसाधनांचा वापर करून बाशग्रामला या बांबू गावाला जागतिक दर्जाचे इको टुरिझम हब बनवण्याचे उद्दिष्ट आहे. असेही ते म्हणाले.

Bamboo 3

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.