SUV Tata Nexon ला १ लाख रूपयांचा फायदा; ७ लाख विक्रीचा टप्‍पा आणि ७वा वर्धापन दिन केला साजरा

157
SUV Tata Nexon ला १ लाख रूपयांचा फायदा; ७ लाख विक्रीचा टप्‍पा आणि ७वा वर्धापन दिन केला साजरा

टाटा मोटर्स ही भारतातील आघाडीची ऑटोमोटिव्‍ह उत्‍पादक कंपनी भारतातील पहिल्‍या क्रमांकाची एसयूव्‍ही ‘नेक्‍सॉन’च्‍या ७व्‍या वर्धापन दिनामध्‍ये तिच्या ७ लाख युनिट विक्रीच्‍या टप्‍प्‍याला साजरे करत आहे. २०१७ मध्‍ये लाँच करण्‍यात आलेल्‍या नेक्‍सॉनने २०२१ ते २०२३ पर्यंत सलग तीन वर्षांसाठी भारतातील सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्‍ही म्‍हणून दर्जा प्राप्‍त केला आहे. नेक्‍सॉन २०१८ मध्‍ये भारतातील पहिली जीएनसीएपी ५ स्‍टार रेटेड वेईकल होती, जेथे या वेईकलने सर्व भारतीय ऑटोमोबाइल्‍सकरिता फॉलो करावा असा बेंचमार्क स्‍थापित केला आहे. तेव्‍हापासून हा वारसा कायम आहे. फेब्रुवारी २०२४ मध्‍ये न्‍यू जनरेशन नेक्‍सॉनला सुधारित २०२२ प्रोटोकॉलनुसार जीएनसीएपी ५ स्‍टार रेटिंग मिळाले, ज्‍यानंतर Nexon.ev ने याच महिन्‍यामध्‍ये भारत-एनसीएपीकडून प्रतिष्ठित ५-स्‍टार रेटिंग प्राप्‍त केले. (SUV Tata Nexon)

४१ प्रतिष्ठित पुरस्‍कारांची विजेती नेक्‍सॉनची सर्वोत्तम कामगिरी तिच्‍या गतीशील विक्री वाढीमधून दिसून येते, जेथे गेल्‍या दोन वर्षांमध्‍ये (२०२२ व २०२३) ३ लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली. पेट्रोल, डिझेल व इलेक्ट्रिक या विविध पॉवरट्रेन्‍समध्‍ये उपलब्‍ध असलेला ब्रँड नेक्‍सॉन काळासह प्रबळ झाला आहे आणि दर्जात्‍मक डिझाइन, सेगमेंट फर्स्‍ट वैशिष्‍ट्य आणि टेक फॉरवर्ड अनुभवासह या वेईकलला निष्‍ठावान चाहते मिळाले आहेत. (SUV Tata Nexon)

याप्रसंगी मत व्‍यक्‍त करत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवत्‍स म्‍हणाले, “२०१७ मध्‍ये लाँच झाल्‍यापासून नेक्‍सॉनने डिझाइन, सुरक्षितता, आरामदायीपणा आणि ड्रायव्हिंग प्‍लेजरमध्‍ये नवीन मानक स्‍थापित केले आहेत. गेल्‍या सात वर्षांमध्‍ये या वेईकलच्‍या वाढत असलेल्‍या ग्राहकवर्गाचा अविरत पाठिंबा आणि प्रेमाने नेक्‍सॉनला उद्योगामधील प्रतिष्ठित ब्रँड बनवले आहे. पॉवरट्रेन्‍स व परसोनाच्‍या व्‍यापक निवडीसह आम्‍ही ग्राहकांच्‍या विकसित होत असलेल्‍या गरजा व सूक्ष्‍मदर्शी निवडींसाठी योग्‍य नेक्‍सॉन उपलब्‍ध असण्‍याची खात्री घेतली आहे. ७ वर्षांमध्‍ये ७ लाख युनिट्सच्‍या विक्रीच्‍या या उल्‍लेखनीय उपलब्‍धीला साजरे करण्‍यासाठी आणि वाढत्‍या नेक्‍सॉन परिवाराचे मनापासून आभार व्‍यक्‍त करण्‍यासाठी आम्‍ही विद्यमान व नवीन ग्राहकांना किमतीसंदर्भात आकर्षक फायदे देत आहोत.” (SUV Tata Nexon)

(हेही वाचा – Eurosetary 2024: पॅरिसमधील संरक्षण प्रदर्शनात भारतीय कंपन्यांनी तयार केलेल्या शस्रांचे प्रदर्शन)

टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍सचे देशभरातील सर्व डिलर्स व शोरूम्‍स नेक्‍सॉनला साजरे करण्‍यासाठी स्‍पेशल इव्‍हेण्‍ट्स आणि ग्राहक भेटींचे आयोजन करत आहेत. नेक्‍सॉन बुक केलेल्‍या आणि डिलिव्‍हरीची वाट पाहत असलेल्‍या ग्राहकांसाठी किंवा विद्यमान नेक्‍सॉनला नवीन अवतारामध्‍ये अपग्रेड करू पाहणाऱ्या ग्राहकांसाठी जवळपास १ लाख रूपयांचे (मॉडेल व व्‍हेरिएण्‍टनुसार) फायदे देण्‍यात आले आहेत, ज्‍यामुळे भारतातील पहिल्‍या क्रमांकाच्‍या एसयूव्‍हीची खरेदी करू पाहणाऱ्यांसाठी ही योग्‍य वेळ आहे. (SUV Tata Nexon)

नेक्‍सॉन अत्‍याधुनिक वैशिष्‍ट्यांसह येते, ज्‍यामध्‍ये अत्‍याधुनिक कनेक्‍टीव्‍हीटी सोल्‍यूशन्‍स, अपग्रेडेड सुरक्षितता सुधारणा व परसोनाज यांचा समावेश आहे, ज्‍यामधून अद्वितीय अनुभव मिळतो. ही वेईकल तिच्‍या विभागामध्‍ये वे अहेड (अग्रस्‍थानी) आहे. या वेईकलमध्‍ये आधुनिक व प्रीमियम डिझाइन शैली समाविष्‍ट आहे, ज्‍यामधून अत्‍याधुनिकता व गतीशीलता दिसून येते आणि ही वेईकल रस्‍त्‍यावर सर्वांचे लक्ष वेधून घेते. ग्राहक व चाहत्‍यांकडून उत्‍साहपूर्ण प्रतिसादामुळे ही वेईकल भारतीय ऑटो उद्योगाच्‍या सर्वात स्‍पर्धात्‍मक विभागामध्‍ये खरीखुरी लीडर ठरली आहे. अधिक माहितीसाठी आजच तुमच्‍या जवळच्‍या टाटा मोटर्स शोरूमला भेट द्या किंवा या लिंकवर क्लिक करा: https://cars.tatamotors.com/nexon/ice.html; https://ev.tatamotors.com/nexon/ev.html कृपया लक्षात ठेवा: फायदे ३० जूनपर्यंत बुकिंग्‍जकरिता मर्यादित कालावधीसाठी असतील. अटी व नियम लागू. (SUV Tata Nexon)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.