महागाई घ्या, अन् कडू-कडू बोला! महागाईनं खिशावर आणली ‘संक्रांत’

महागाई दर पोहोचला ५.५९ टक्क्यांवर

एकीकीडे कोरोना महामारीने सामान्य माणसांचं जगणं कठीण केलं असताना आता महागाईने देखील सर्व सामान्यांचं कबंरडं मोडलं आहे. इंधन, खाद्यतेलसह सिलेंडरचे दर वाढल्याने डिसेंबर महिन्यातील महागाईचा दर वाढून तो 5.59 टक्क्यांवर पोहोचल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयने बुधवारी महागाई दराची आकडेवारी जाहीर केली. त्यामध्ये डिसेंबर 2021 महिन्यात अन्नधान्य महागाईत वाढ नोंदविल्याचे स्पष्ट केले. डिसेंबरमध्ये महागाई दर 5.59 टक्क्यांवर गेला. औद्योगिक उत्पादन निर्देशांकानुसार (IIP) भारतातील कारखान्याच्या उत्पादनातही नोव्हेंबरमध्ये 1.4 टक्क्यांची वाढ झाल्याचे सांगितले गेले आहे.

महागाई दराने गाठला उच्चांक 

देशातंर्गत केंद्र आणि राज्य सरकारने भला मोठा कर लादला आहे. त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर दिसून येत आहे. डिझेलच्या किंमती वाढल्याने दळणवळण महाग परिणामी वस्तू, भाजीपाला आणि किराणा महागला आहे. देशाचा वार्षिक घाऊक महागाई दराने उच्चांक गाठला आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने बुधवारी डिसेंबर 2021 च्या किरकोळ महागाई दराची आकडेवारी प्रसिद्ध केली. डिसेंबरमध्ये खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर 4.5 टक्के झाला. नोव्हेंबरमध्ये हाच दर 1.87 टक्के होता. खाद्यतेलाच्या किमती अजूनही चढ्याच आहेत. खाद्यतेलाच्या महागाई दरात तब्बल 24.32 टक्के तर इंधन आणि विजेच्या महागाईमध्ये 10.95 टक्के वाढ झाली आहे.

(हेही वाचा -भारत-पाकिस्तान फाळणीत वेगळे झाले भाऊ, 74 वर्षांनी भेटले आणि…)

ग्राहकांवरच ओढवली संक्रांत

याशिवाय इलेक्ट्रॉनिक वस्तू महाग होऊन काहीच दिवस झाले असताना आता सर्वांची रोजची गरज असलेले साबण, डिटर्जंटच्या खरेदीसाठी आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. हिंदुस्तान युनिलीव्हरने साबण आणि डिटर्जंट यांच्या किमतींमध्ये 3 टक्क्यांपासून 20 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांना त्याचा मोठा फटका बसणार आहे. यासोबत भाज्यांचे दरही महागल्याचे समोर आले आहे. भोगीमुळे भाज्यांचे दर व्यापाऱ्यांनी अचानक वाढवले होते. त्यामुळे ग्राहकांवरच संक्रांत ओढवल्यासारखी स्थिती बुधवारी बाजारात होती. गाजर 80 ते 100 रुपये, कांदा पात एक जुडी 20 रुपये, मेथी 15 ते 20 तर वांगी 100 ते 120 रुपये किलाेच्या दराने व्यापारी ग्राहकांना विकत होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here