Indo Western Dress For Men : जाणून घ्या indo-western साठी कोणता असू शकतो dress code??

124
Indo Western Dress For Men : जाणून घ्या indo-western साठी कोणता असू शकतो dress code??
Indo Western Dress For Men : जाणून घ्या indo-western साठी कोणता असू शकतो dress code??

पाश्चात्य आणि दक्षिण आशियामध्ये परिधान केल्या जाणाऱ्या वेशभूषेचे मिश्रण करून एक वेगळीच वेशभूषा तयार करण्यात आली. या वेशभूषेलाच इंडो-वेस्टर्न ड्रेसकोड असं म्हणतात. ब्रिटिशांच्या काळात महत्वाच्या पदांवर काम करणाऱ्या सुशिक्षित महिलांनी इंडो-वेस्टर्न डिझाइन्स तयार करायला आणि वापरायला सुरुवात केली. त्याची सुरुवात फुगीर स्लीव्ह असलेल्या ब्लाऊजपासून झाली. असे फुगीर स्लीव्ह व्हिक्टोरियन काळात युरोपियन देशांमध्ये प्रचलित होते. (Indo Western Dress For Men)

भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशामध्ये सिनेमाचं सुवर्णयुग सुरू झालं. सिनेमाच्या माध्यमातून पाश्चात्य वेशभूषा आपल्या भारतीय संस्कृतीत रुजायला सुरुवात झाली. १९६० सालच्या दशकामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीवर पाश्चिमात्य देशांचा बऱ्यापैकी प्रभाव होता. हे त्या काळच्या चित्रपटांमधून अगदी स्पष्ट दिसत होतं. त्या काळी प्रदर्शित झालेला ‘ॲन इव्हनिंग इन पॅरिस’ नावाच्या चित्रपटाची वेशभूषा आणि नेपथ्य यांच्यामधून पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. (Indo Western Dress For Men)

(हेही वाचा – विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर MNS ला आता ठाण्यातून मोठा धक्का)

१९६० आणि १९७० सालच्या दशकांमध्ये पाश्चात्य देशांमध्ये भारताच्या संस्कृतीचा आणि वेशभूषेचा प्रभाव वाढताना दिसून आला. त्याचप्रमाणे आपल्या भारतामध्येही पाश्चात्य वेशभूषेचा प्रभाव दिसत होता. पुढे ८० आणि ९० सालच्या दशकांमध्येही ही परस्पर विनियोगाची परंपरा सुरूच राहिली. त्याकाळच्या फॅशनमध्ये भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीचं मिश्रण दिसू लागलं. त्या काळच्या पाश्चात्य फॅशन डिझायनर्सनी आपल्या डिझाईन्समध्ये भारतीय नक्षीकाम, भरतकाम यांसारख्या हस्तकलांचा वापर करायला सुरुवात केली. त्याप्रमाणेच भारतातही कपड्याच्या फॅशनमध्ये पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव वाढू लागला होता. (Indo Western Dress For Men)

पुरुषांच्या इंडो-वेस्टर्न कपड्यांच्या लोकप्रिय शैली
  • इंडो-वेस्टर्न जोधपुरी सूट हा पुरुषांच्या पारंपरिक जोधपुरी सूटचं आधुनिक रूपांतर आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हा एक उत्तम पोशाख आहे.
  • इंडो-वेस्टर्न कुर्ते हे फक्त महिलांसाठीच नाहीत. तर पुरुषांसाठीही या कुर्त्यांचे वेगवेगळे डिझाईन्स मिळू शकतात. कौटुंबिक कार्यक्रम आणि लहान फंक्शनसाठी असे कॅज्युअल कुर्ते वापरता येतात.
  • वेस्टर्न जॅकेट सोबत इंडो-वेस्टर्न कुर्ते वेगवेगळ्या पॅन्ट्स आणि जीन्स सोबत वापरले जाऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक वेळी पर्सनॅलिटी वेगळी दिसू शकेल.

अशा प्रकारच्या इंडो-वेस्टर्न स्टाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंग, प्रिंट आणि नमुने वापरता येतात.

(हेही वाचा – Accident News : कोल्हापूरातील तिलारी घाटात मिनी बसला अपघात; बसमध्ये २० प्रवासी …)

इंडो-वेस्टर्न कपड्यांचे लोकप्रिय ब्रँड

पुरुष आणि महिलांसाठी पाश्चात्य कपडे तयार करण्यासाठी वेगवेगळे ब्रँड लोकप्रिय आहेत. त्यांपैकी तुम्ही तुमच्या आवडीच्या डिझायनर कडून कपडे खरेदी करू शकता.

इंडो-वेस्टर्न फॅशनसाठी सेफ्रॉन लेन कंपनी, मान्यवर, मसाबा गुप्ता, राहुल मिश्रा, मनीष मल्होत्रा, निकोबार, आणि अंजू मोदी हे डिझायनर्स ब्रँड सर्वांत जास्त ओळखले जाणारे आणि लोकप्रिय ब्रँड आहेत.

याव्यतिरिक्त तुम्हाला बजेट-फ्रेंडली पर्याय हवे असल्यास ग्लोबल देसी, मिसप्रिंट, जयपूर, बुनाई, एस अँड एफ, मेहेर, रास इंटरनॅशनल क्लोदिंग इंक आणि उत्सव फॅशन या ब्रँड्स मधून तुम्ही आपल्या बजेटमध्ये खरेदी करू शकता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.