दुचाकी चालवणं विकी कौशलला पडलं महागात, इंदूरमध्ये तक्रार दाखल!

विकी कौशल आणि सारा अली खानचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे दोन्ही कलाकार त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी इंदूरमध्ये आहेत. याच दरम्यान विकी कौशल विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चित्रपटाचे शुटींग करताना, विकी याने बनावट दुचाकी नंबर प्लेट वापरल्या संदर्भात मध्य प्रदेशातील एका व्यक्तीने ही तक्रार दाखल केली आहे.

( हेही वाचा : 2 जानेवारी अन् भारतरत्न पुरस्काराचा काय आहे संबंध? जाणून घ्या… )

विकी कौशल विरोधात तक्रार

जयसिंग यादव यांनी बनावट नंबर प्लेट वापरली म्हणून विकी कौशल विरोधात तक्रार केली आहे. तक्रारदाराने दावा केला आहे की, चित्रपटात दुचाकीसाठी वापरलेला वाहन क्रमांक हा त्यांचा आहे आणि अभिनेता त्याच्या परवानगीशिवाय ती नंबर प्लेट वापरू शकत नाही. “चित्रपट युनिटला याची माहिती आहे की नाही हे मला माहीत नाही पण हे बेकायदेशीर आहे. ते परवानगीशिवाय माझी नंबर प्लेट वापरू शकत नाहीत. मी पोलिस स्थानकात निवेदन दिले आहे. या प्रकरणी कारवाई झाली पाहिजे” असे तक्रारदाराने स्पष्ट केले आहे.

याबाबत इंदूरच्या बाणगंगा भागातील उपनिरीक्षक राजेंद्र सोनी म्हणाले, “आम्हाला जयसिंग यादव यांच्याकडून तक्रार आली आहे. नंबर प्लेटचा वापर बेकायदेशीरपणे झाला आहे का ते आम्ही पाहू. मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई केली जाईल. जर चित्रपट युनिट इंदूरमध्ये असेल तर, आम्ही त्यांची चौकशी करण्याचा प्रयत्न करू.” असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कतरिना सोबत लग्न झाल्यावर विकी कौशल आगामी चित्रपटाच्या शुटींगसाठी इंदूरला रवाना झाला होता. या दरम्यान ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here