-
ऋजुता लुकतुके
मोबाईल फोन्समध्ये व्हॅल्यू फॉर मनी म्हणजेच व्हीएफएम ही संकल्पना खूप रुळलेली आहे. म्हणजे अशा मोबाईलमध्ये गेमिंग, कॉलिंग आणि कॅमेरासाठी लागणारे सगळे आधुनिक फिचर्स असतात. पण, फोनची किंमत अगदीच वाजवी किंवा किफायतशीर असते.
हाँगकाँगमधील इनफिनिक्स ही कंपनी असे व्हीएफएम फोन बनवण्यासाठीच ओळखली जाते. कंपनीचा हॉट ५० ५जी (Infinix Hot 50 5G) फोन नुकताच भारतीय बाजारपेठेत लाँच झाला आहे. ९ सप्टेंबरपासून फ्लिपकार्ट (Flipkart) या ई-कॉमर्स वेबसाईटवर तो उपलब्ध होणार आहे. ४८ मेगापिक्सेलचा कॅमेरा, ६.७ इंचांचा मोठा डिस्प्ले आणि मिडियाटेक डिमेन्सिटी ६३०० प्रोसेसर असं सगळं तुम्हाला ८,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत मिळणार आहे. ४ जीबी रॅम आणि १२८ जीबीचं स्टोरेज या फोनला असेल. तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजचा फोन ९.८९९ रुपयांना मिळेल.
(हेही वाचा – Karnataka काँग्रेस सरकारने रोखला बी.जी. रामकृष्ण यांचा ‘सर्वोत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’)
#InfinixHot50 5G with 6.7″ 120Hz display, Dimensity 6300, up to 8GB RAM launched in India starting at Rs. 9,999 https://t.co/maZwKJ2RA0 pic.twitter.com/ZBFz63CkBr
— FoneArena Mobile (@FoneArena) September 5, 2024
पैशाच्या मानाने या फोनची फिचर्स किती उजवी आहेत ते समजून घेऊया.
कंपनीने ५जी तंत्रज्जानात झालेल्या बदलांनंतर खास हा ५जी सुविधा देणारा फोन लाँच केला आहे. वाजवी किमतीबरोबरच इन्फिनिक्सचे फोन त्याच्या डिझाईनसाठी ओळखले जातात. या फोनमध्येही तज्जांनी फोनचं डिझाईन, बॅटरी, कॅमेरा तसंच ऑपरेटिंग प्रणालीला ५ पैकी ४ गुण दिले आहेत.
(हेही वाचा – Ajit Pawar : “अजित पवारांचा संघाविषयीचा निर्णय : युतीमध्ये वाढणाऱ्या तणावाचा संकेत?”)
आताही या स्मार्टफोनमध्ये एमोल्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याची प्रखरता १२०० हर्ट्झ इतकी आहे. तर स्क्रीनचा आकार ६.७ इंच इतका आहे. अँड्रॉईड १4 या अत्याधुनिक प्रणालीवर हा फोन चालतो. ८ जीबी रॅम असलेल्या या फोनमध्ये किमान १२८ जीबी इतकी साठवणूक क्षमता देण्यात आली आहे. आणि ती १ टीबी इतकी वाढवता येऊ शकेल. त्यासाठी एसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे.
इन्फिनिक्सचा (Infinix Hot 50 5G) कॅमेराही चांगला आहे. प्राथमिक कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा आहे. तर सेल्फी कॅमेरा १६ मेगापिक्सलचा आहे. मॅजिक ब्लॅक आणि व्हेरिएबल गोल्ड यांच्यासह अगदी गुलाबी रंगातही हा फोन उपलब्ध आहे. सुरुवातीला फक्त फ्लिपकार्टवर फोनची नोंदणी करता येईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community