महागाईच्या काळात ‘असा’ वाचवा तुमचा गॅस; ‘या’ काही किचन टिप्स तुमच्यासाठी

LPG च्या किमती इतक्या वाढल्या आहेत की त्याचा परिणाम गृहिणींच्या बजेटवरदेखील झाला आहे. ज्यामुळे महिलांचा कल असतो तो गॅस वाचवण्याकडे. आम्ही काही टिप्स तुमच्यासाठी आणल्या आहेत, ज्यामुळे गॅस वापरताना फायदा होईल.

या काही टीप्स

  • फ्रीजमधील पदार्थ थेट शिजवू नका

अनेक महिलांना ही सवय असते की थेट फ्रीजमधून दूध किंवा भाजी काढताना आणि वस्तू थेट गॅसवर ठेवू नका. किमान 1-2 तास आधी फ्रीजमधून पदार्थ बाहेर काढा.

( हेही वाचा: ‘आधार कार्ड’ संंबंधी सरकारने केला ‘हा’ नवा नियम )

  • नाॅन- स्टिक भांडी वापरा

गॅस वाचवण्यासाठी तुम्ही नाॅन- स्टिक पॅन वापरु शकता. यामुळे गॅस कमी लागतो किंवा जेवण पटकन शिजते. शिवाय यामध्ये तेलदेखील कमी लागते, त्यामुळे तेलाचीदेखील बचत होते. नाॅन-स्टिक पॅनमध्ये स्वयंपाक केल्याने अन्न परिपूर्ण होईल आणि अन्न जळणार नाही. यामुळे तुमचा सिलेंडरही वाचेल.

  • कोरड्या भांड्यात अन्न शिजवा

ओल्या भांड्यात अन्न शिजवल्याने गॅसचा वापर जास्त होतो. त्यामुळे तुम्ही काहीही शिजवत असाल तर कधीही भांडी कोरडी करा. त्यानंतर अन्न शिजवा. याद्वारे तु्म्ही स्वयंपाकाच्या गॅसची बचत करु शकाल.

  • प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवा

स्वयंपाकासाठी प्रेशर कुकर वापरण्याची खात्री करा. मसूर, मांस, चिकन आणि अनेक भाज्या उकळण्यासाठी जास्त गॅस लागतो, त्यामुळे अशा भाज्या किंवा मांस शिजवण्यासाठी नेहमी प्रेशर कुकरचा वापर करा. जर तुमच्याकडे मायक्रोव्हेव असेल, तर त्यात मांस किंवा चिकन अर्धवट शिजवा. कारण मायक्रोव्हेवमध्ये मांस किंवा चिकन लवकर शिजते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here