तुमचं इन्स्टाग्राम अकाऊंट तुमच्याशिवाय कोण वापरतंय? या प्रक्रियेद्वारे मिळेल संपूर्ण माहिती

140

अलिकडे अनेक इंस्टाग्राम युजर्सचे अकाऊंट हॅक होत असल्याच्या घटना घडल्या. यामुळे इंस्टाग्रामने सुरक्षा फिचर्स आणि लॉगिन प्रक्रिया अधिक मजबूत केली आहे. आता तुम्हाला तुमची लॉगिन अ‍ॅक्टिव्हिटी सतत चेक करता येणार आहे. यामुळे कोणी अपरिचित व्यक्ती तुमचे अकाऊंट अ‍ॅक्सेस करत असेल तर तुम्हाला लगेच माहिती मिळेल. तुमच्याशिवाय तुमचं अकाऊंट कोण वापरतंय अशाप्रकारे मिळेल तुम्हाला संपूर्ण माहिती…

( हेही वाचा : उबेरमधून प्रवास करताना अभिनेत्रीला आला धक्कादायक अनुभव! आरडाओरड केल्यानंतर झाली सुटका)

Instgram Login Activity फिचरची माहिती 

  • Instgram Login Activity या फिचरद्वारे तुम्हाला तुमच्या अकाऊंट लॉगिन संदर्भात संपूर्ण माहिती मिळेल. याफिचरमध्ये तुम्ही किंवा इतर कोणतीही ओळखीची किंवा अनोळखी व्यक्ती तुमच्या इन्स्टाग्राम खात्यात लॉग इन असेल तर त्याची माहिती सेव्ह राहते.
  • Instgram Login Activity या पर्यायाद्वारे तुम्ही संशयास्पद व्यक्तीला लॉगआऊट सुद्धा करू शकता. इन्स्टाग्राम अ‍ॅपवर उजव्या कोपऱ्यात तुमच्या प्रोफाइलवर टॅप करा. सेटिंग्जमध्ये तुम्हाला login activity हा पर्याय दिसेल यावर टॅप करा.
  • आता तुम्ही तारीख आणि अंदाजे तुमचे खात्यामध्ये किती डिव्हाईस लॉगिन आहे याची माहिती घेऊ शकता.

क्यूआर कोड पर्यायाद्वारे कसे शेअर करणार पोस्ट आणि Reels?

इंस्टाग्रामवरील युजर्ससाठी आता क्यूआर कोड शेअरिंग पर्याय उपलब्ध असेल. यासाठी तुम्हाला फक्त कोणत्याही रिल्स, पोस्ट किंवा लोकेशनवरील थ्री-डॉट मेन्यूवर क्लिक करा. यामध्ये वरच्या बाजूला उजवीकडे क्यूआर कोड ऑप्शनवर क्लिक करा तुम्ही आता क्यूआर कोड कॅमेरा रोलमध्ये सेव्ह करू शकता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.