इन्स्टाग्राम वापरताय? आता मोजावे लागणार पैसे…

अलिकडच्या तरुणाईला समाजमाध्यमांविषयी विशेष आकर्षण आहे. इन्स्टाग्राम हे अॅप तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे. सध्या इन्स्टाग्राम विनाशुल्क वापरता येत असलं तरी लवकरच त्यासाठी पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. येत्या वर्षाच्या सुरवातीला हा बदल होऊ शकतो अशी, माहिती इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मॉसियर यांनी दिली आहे. इन्स्टाग्रामवर अपलोड व्हिडीओ, मजकूर, फोटो यांचा आनंद घेण्यासाठी ग्राहकांना दरमहा ८९ रुपये मोजावे लागणार आहे.

अशी असणार सबस्क्रिप्शन प्रक्रिया

इन्स्टाग्राम सबस्क्रिप्शन ट्विटर ब्लू प्रमाणेच असण्याची अपेक्षा आहे. रिव्हर्स इंजिनीअर आणि टिपस्टर अलेस्सांद्रो पलुझी यांनी ट्विटच्याद्वारे माहिती दिली की, इन्स्टाग्राम एका सबस्क्राइब बटणाची चाचणी करत आहे जे निर्मात्याच्या प्रोफाइलवर दिसेल. याचा अर्थ असा आहे की चाहते सदस्यत्व घेऊ शकतात आणि कथा आणि लाइव्ह व्हिडिओ यासारख्या अनन्य सामग्रीमध्ये सबस्क्रिप्शनच्या आधारे प्रवेश मिळवू शकतात. सब्सक्रिप्शन घेतल्यानंतरच इन्स्टाग्राम युझर्स त्यांच्या आवडीच्या क्रिएटर्सचा कंटेट पाहू शकणार आहेत.

( हेही वाचा :आता भारताने चीनसह ‘या’ देशांचा ‘ई-व्हिसा’ नाकारला, बघा यादी )

सबस्क्रिप्शन घेणा-या युजर्सला बॅच

अॅपल स्टोरच्या लिस्टिंगमध्ये इन्स्टाग्राम इन-पर्चेसमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. सध्यातरी हे शुल्क दरमहा ८९ रुपये आहे. प्रत्यक्ष वापरात आल्यानंतर मात्र या शुल्कात बदल होऊ शकतो. ज्या युजर्सनी सबस्क्रिप्शन घेतले आहे. त्यांना इन्स्टाग्रामकडून बॅच दिला जाईल. युझरने काही कमेंट किंवा मेसेज केला तर त्याच्या युजरनेमसमोर हा बॅच दिसणार आहे. या माध्यमातून युझरला `सब्सक्रिप्शन घेतलेला युझर्स` अशी ओळख मिळणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here