International Mens day : दरवर्षी ‘आंतरराष्ट्रीय पुरुष दिन’ का साजरा केला जातो? देशात महिलांपेक्षा पुरुष आत्महत्येचे प्रमाण अडीच पट जास्त

115

महिना दिनाप्रमाणेच दरवर्षी १९ नोव्हेंबरला संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. कुटुंब, विवाह, मुलांची काळजी आणि समाजात पुरुषांचे योगदान साजरे करणे, समाजातील पुरुषांवरील भेदभाव, शोषण, छळ आणि हिंसेविरुद्ध आवाज उठवणे आणि त्यांना त्यांचे हक्क मिळवून देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. दरवर्षी या दिनानिमित्त थीम निश्चित केली जाते. यावर्षी ‘आंतरराष्ट्रीय पुरुष दिन 2022’ ची थीम ‘हेल्पिंग मेन अँड बॉयज’ (Helping Men And Boys) ही आहे. जागतिक स्तरावर पुरुष आणि मुलांचे आरोग्य आणि कल्याण सुधारणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

( हेही वाचा : Online Payment : चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केलेत आता नो टेन्शन! असे मिळवा परत, काय आहे RBI चे नियम?)

आंतरराष्ट्रीय पुरूष दिनाचा इतिहास

आंतरराष्ट्रीय पुरूष दिन हा १९ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. १९९९ मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील वेस्ट इंडिज विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक डॉ. जेरोम तेलकसिंग यांनी त्यांच्या वडिलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पुरूष दिन पहिल्यांदा साजरा केला. या दिवशी त्यांनी पुरूषांचे प्रश्न मांडण्यासाठी प्रोत्साहन दिले. १९ नोव्हेंबर २००७ रोजी भारतात पहिल्यांदा पुरूष दिन साजरा करण्यात आला होता.

पुरुष आत्महत्येचे प्रमाण महिलांपेक्षा जास्त 

पुरूषांचे संघर्ष आणि वर्षानुवर्षे सामोरे जात असलेल्या सामाजिक परिस्थितीची माहिती समाजाला होण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पुरुषांचे कुटुंबात सुद्धा वेगळे स्थान असते त्यांच्या योगदानाचे कौतुक करणे महत्त्वाचे आहे. पुरुषांच्या आत्महत्येचे प्रमाण सुद्धा महिलांपेक्षा जास्त आहे. २०१९ साली ९७ हजार ६१३ पुरूषांनी आत्महत्या केल्या होत्या तर महिला आत्महत्येचे प्रमाण २०१९ मध्ये ४१ हजार ४९३ होते.

NCRB च्या अहवालानुसार, २०२० मध्ये १ लाख ८ हजार ५३२ पुरुषांनी आत्महत्या केल्या तर महिला आत्महत्येचे प्रमाण ४४ हजार ४९८ होते. याचा अर्थ महिलांपेक्षा पुरुष आत्महत्येचे प्रमाण २.४४ टक्के जास्त आहे. पुरुषांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.