संपूर्ण जगात ‘जागतिक योग दिन’ २१ जून रोजी उत्साहात साजरा केला जाणार आहे. योग दिनाच्या या मुहूर्तावर योग साधनेची उपासना सुरू करण्यासाठी काहीच हरकत नाही. याच नियमित योगाभ्यासामुळे होणारे दहा फायदे जाणून घ्या.
नियमित योगाभ्यासाचे फायदे
१. तंदूरुस्ती
२. वजनात घट
३. ताण-तणावापासून मुक्ती
४. आंतरिक शांतता
५. रोगप्रतिकारक शक्तीत वाढ
६. सजगतेत वाढ
७. नाते संबंधात सुधारणा
८. ऊर्जा शक्तीत वाढ
९. शरीराचा लवचिकपणा आणि शरीराची ठेवण सुधारते
१०. संयम वाढतो
रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपली आंतरिक शक्ती गमावत चाललो आहोत. या आंतरिक शक्तीला परत मिळविण्यासाठी नियमित योगाभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे. नियमित योगाभ्यास केल्याने आपल्या शरीराला नवचैतन्य मिळते. जेवण, झोप याप्रमाणेच योगाभ्यासालाही महत्व देणे फार गरजेचे आहे.
(हेही वाचा – योगा करून जीवनात मोठ्या परिवर्तनाचा लाभ घ्या – पंतप्रधान नरेंद्र मोदी)
नियमित योगाभ्यासाने वजनात घट, सशक्त आणि शरीर लवचिक होते. तसेच आपली त्वचाही तजेलदार होऊन मन शांत आणि प्रसन्न रहाते. वरील योगासाभ्याचे दहा फायदे वाचून तुम्हालाच तुमचे उत्तर सापडले असेल. तर मग चला, तुमच्या नियमित योगाभ्यासाला आजच सुरुवात करा आणि आपले जीवन चैतन्यमय बनवा.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community