आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने मुंबईतील ‘गेटवे ऑफ इंडिया’ समोर सकाळी ९ वाजून ९ मिनिटांनी नऊवारी साडी नेसून ९० महिला योगा करणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी व्हिडीओ ट्वीटर करत केले आहे.
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश
उद्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने मुंबई येथे खास महिलांसाठी सकाळी ९ वाजून ९ मिनीटांनी नऊवारी नेसत मुंबईचे प्रवेशद्वार “गेट वे ऑफ इंडीया” ९० महिला योगा करणार आहेतआपण ही सादर निमंत्रीत आहात …..नक्की या पण नऊवारी नेसून 😊😊… pic.twitter.com/XNSocdgvdB
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 20, 2023
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा योग दिन मोठ्या उत्साहात होणार असून यातच भारतीय जनता पक्षातर्फे एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे पारंपारिक वस्त्र म्हणून ओळखली जाणारी नऊवारी साडी परिधान करत बुधवारी २१ जून रोजी ‘गेटवे ऑफ इंडिया’ समोर ९० महिला सकाळी ९ वाजून ९ मिनिटांनी योगा करणार आहेत.
योगा दिनानिमित्त मोदींचा अमेरिकेत कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सकाळी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले आहेत. दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी ७२ तासांत १० कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार असून न्यूयॉर्कमध्ये २१ जून रोजी योगा करणार आहेत.
Join Our WhatsApp Community