गुंतवणुकीकडे महिला पाहतात तरी कशा? ‘या’ गोष्टींना स्त्रिया देतात महत्त्व

112

गुंतवणुकीच्या बाबतीत पुरुषांच्या तुलनेत महिलांचे नियोजन पूर्णपणे वेगळे असते. विशेषत: कोविड -19 साथीनंतर महिलांच्या गुंतवणुकीत मोठे बदल झाले आहेत. डीएसपी विनव्हेस्टर पल्स 2022 च्या आकडेवारीनुसार, आता महिला स्वत: निर्णय घेऊ लागल्या आहेत. मात्र, पुरुषांच्या तुलनेत त्यांची भागीदारी अजूनही कमी आहे.

कसे घेतात निर्णय?

  • 65 टक्के पुरुष स्वत: घेतात गुंतवणुकीचे निर्णय
  • 44 टक्के महिला स्वत: घेतात गुंतवणुकीचे निर्णय
  • महिला पतीकडून घेतात वित्तीय सल्ला.
  • पुरुष पित्याकडून घेतात वित्तीय सल्ला.
  • गुंतवणूकदार पुरूष सल्लागारांना देतात प्राधान्य

गुंतवणुकीचे सर्वोच्च लक्ष्य काय?

  • आर्थिक स्थिरतेला प्राधान्य
  • पुरुषांचे उच्च परतावा व निवृत्ती लाभांवर अधिक लक्ष
  • कर्जमुक्त जीवनास पुरुषांकडून प्राधान्य
  • महिलांचे मुलांच्या शिक्षणाला अधिक प्राधान्य
  • महिलांना नवे घर खरेदी करण्यात अधिक रुची

( हेही वाचा: UPI पेमेंट फेल झाल्यानंतरही पैसे कापले गेलेत? कुठे कराल तक्रार? )

कोणाचा कल कुठे?

  • महिला सुरक्षा, स्थिरता व शिस्तीला देतात सर्वाधिक महत्त्व
  • पुरुषांना अधिक जोखीम घेणे आवडते.
  • महिलांचा कल एफडी, पोस्टल डिपाॅजिट, ब्रॅंड यांच्याकडे
  • अधिकांश पुरुषांची स्टाॅक मार्केट, मुच्युअल फंडास पसंती.

रोख कोठे होते खर्च?

पुरुष स्टाॅक मार्केट, म्युचुअल फंडात अतिरिक्त रक्कम लावतात. नवीन तंत्रज्ञान, कर्ज फेडण्यास पुरुषांकडून प्राधान्य, महिलांना नवीन कपडे, घर सजवण्यास रस, फिरायला जाण्यावर खर्च होतो अतिरिक्त पैसा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.