सध्याच्या महागाईच्या काळात गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे. कमी पैशात जास्त परतावा मिळवायचा असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडातही गुंतवणूक करु शकता. आता आम्ही तुम्हाला रोज 100 रुपये वाचवून 15 वर्षांत 20 लाखांचा परतावा कसा मिळवावा हे सांगणार आहोत.
अशी करा गुंतवणूक
तुम्ही जर दिवसाला 100 रुपये वाचवलेत तर ते महिन्याला 3 हजार रुपये होतील. तुम्ही हे 3 हजार रुपये दरमहा एका चांगल्या म्युच्यु्अल फंड योजनेच्या सिस्टिमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅनमध्ये टाकू शकता. तुम्हाला ही गुंतवणूक सलग 15 वर्षे करावी लागेल. सध्या बाजारात असे अनेक म्युच्युअल फंड आहेत, ज्यांनी गेल्या 15 वर्षांत दरवर्षी 15 टक्के दराने परतावा दिला आहे. जर तुम्हाला इतका परतावा मिळत राहिला तर 15 वर्षांनंतर तुमच्याकडे 20 लाख रुपयांचा निधी जमा असेल.
( हेही वाचा: आता परदेशात पैसे पाठवणं झालं सोपं; काय आहेत नवीन फीचर्स? )
अशा प्रकारे वाढेल रक्कम
तुम्ही म्युच्युअल फंड प्लॅनमध्ये दरमहा 3 हजार रुपये गुंतवता आणि ही गुंतवणूक 15 वर्षे सतत सुरु राहिल्यास तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकता. 15 वर्षानंतर तुमची एकूण गुंतवणूक 5.40 लाख रुपये होईल. जर तुमच्या फंड मॅनेजरची कामगिरी चांगली असेल, तर 15 वर्षांनंतर तुमच्या एसआयपीचे एकूण मूल्य 20 लाख रुपये होईल.
गुंतवणुकीसाठी SIP उत्तम पर्याय
कोणत्याही सामान्य गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे एसआयपी. अशा प्रकारे गुंतवणूक केल्याने एव्हरेजिंग होते, त्यामुळे तोटा होण्याचा धोका कमी होतो,असे झाल्यावर चांगले उत्पन्न मिळण्याच्या शक्यताही वाढतात.
Join Our WhatsApp Community