iPhone 17 Air : ॲपलप्रेमींना उत्सुकता नवीन आयफोन १७ एअरची

नवा आयफोन १७ एअर फोनची ५ नवीन वैशिष्ट्य जाणून घेऊया.

36
iPhone 17 Air : ॲपलप्रेमींना उत्सुकता नवीन आयफोन १७ एअरची
iPhone 17 Air : ॲपलप्रेमींना उत्सुकता नवीन आयफोन १७ एअरची
  • ऋजुता लुकतुके

ॲपल कंपनी येत्या सप्टेंबर २०२५ मध्ये आपली नवीन आयफोन १७ मालिका बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. यंदा नियमित प्रो आणि मॅक्स फोनच्या बरोबरीने कंपनी आयफोन १७ एअर (iPhone 17 Air) हे नवीन मॉडेलही उतरवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. अलीकडेच या नवीन मॉडेलची केस लीक झाल्याची बातमी आहे. त्यावरून हा फोन इतर आयफोनपेक्षा थोडा वेगळा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयफोन १७ एअर (iPhone 17 Air) नेमका कसा असेल याविषयी उपलब्ध माहिती जाणून घेऊया,

एअर या नावातच फोनचं एक संभाव्य वैशिष्ट्य दडलेलं आहे. हा फोन इतर सर्व आयफोनच्या तुलनेत सगळ्यात कमी जाडी असलेला असेल असा अंदाज आहे. जाणकारांनी तर फोनची जाडी ५.५ मिलीमीटर ते ६.२५ मिमीपर्यंत असेल असं म्हटलं आहे. यापूर्वी कंपनीने आणलेला आयफोन ६ हा फोन जाडीत सगळ्यात कमी म्हणजे ६.९ मिमी इतका होता. पण, फोनची जाडी कमी झाल्यामुळे इतर काही फिचर गायब होऊ शकतात. पण, अर्थात आयफोनच्या इतर सर्व फोनमध्ये १७ एअर हा फोन नक्कीच या वैशिष्ट्यामुळे वेगळा ठरेल.

(हेही वाचा – परदेशातील भारतीय विद्यार्थ्यांनी स्थानिक कायदे पाळावे; भारतीय Ministry of External Affairsच्या सूचना)

आयफोनच्या अलीकडच्या फोनमध्ये मॅक्स आणि प्रो या दोन्ही फोनमध्ये किमान दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. मॅक्स प्रोमध्ये तर अल्ट्रावाईड (Ultrawide) आणि टेलिफोटो (telephoto) अशा दोन लेन्सचे मिळून एकूण तीन कॅमेरे देण्यात येतात. यावेळी एअर फोनमध्ये फक्त एक रेअर कॅमेरा आणि एक सेल्फी कॅमेरा असेल अशी शक्यता आहे. हा कॅमेरा ४८ मेगापिक्सेलचा असेल. आयफोन १७ एअरची (iPhone 17 Air) एक केस अलीकडे लीक झाली आहे. त्यावरून हा कॅमेरा फोनच्या सगळ्यात वर असेल असा अंदाज बांधण्यात येत आहे.

आयफोन १७ एअरचा (iPhone 17 Air) डिस्प्ले हे फोनचं आणखी एक वैशिष्ट्य असेल. फोनचा डिस्प्ले ६.६ ते ६.७ इंचांचा असेल. म्हणजेच हा डिस्प्ले प्रो फोनपेक्षा मोठा आणि मॅक्स प्रोपेक्षा थोडा लहान असेल.

(हेही वाचा – POCSO COURT मध्ये आतापर्यंत ३ लाखांहून अधिक प्रकरणे निकाली; सरकारचे लोकसभेत निवेदन)

आयफोन १६ ईनंतर ५जी मॉडेम चिप वापरलेला हा दुसरा आयफोन असेल अशी शक्यता आहे. या मॉडेमचा वेग प्रतीसेकंद ४ जीबी इतका असू शकेल. पूर्वी आयफोनने क्वालकॉम प्रोसेसर आपल्या फोनमध्ये वापरले आहेत. आता आपले स्वत:चे मॉडेम वापरण्याकडे कंपनीचा कल दिसतो आहे.

कंपनीला आयफोन १७ एअर (iPhone 17 Air) हा १७ व्या मालिकेतील सगळ्यात स्वस्त फोन म्हणून लोकांसमोर आणायचा आहे. त्यामुळे या फोनमध्ये ए१९ चिप असेल. आणि ए१९ प्रो चिप वापरण्यात येणार नाही, असा अंदाज आहे. त्यामुळे प्रो आणि मॅक्स प्रो फोनच्या तुलनेत या फोनचा प्रोसेसर थोडा धिमा असेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.