IPS Officer Salary : आयपीएस अधिकाऱ्याला भारतात नेमका किती पगार मिळतो?

IPS Officer Salary : आयपीएस हे सरकारी नोकऱ्यांमध्ये मानाचं पद आहे.

166
IPS Officer Salary : आयपीएस अधिकाऱ्याला भारतात नेमका किती पगार मिळतो?
  • ऋजुता लुकतुके

आयपीएस किंवा इंडियन पोलीस सेवा हे भारतीय प्रशासकीय सेवेतील एक जबाबदारीचं आणि मानाचं पद आहे. केंद्रीय सुरक्षा दल किंवा राज्य पोलीस सेवेत तुम्ही जाऊ शकता. त्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. दरवर्षी साधारणपणे ५ ते ८ लाख लोक आयपीएस परिक्षेला बसतात आणि त्यातील फक्त १०० आयपीएसमध्ये सामावून घेतले जातात. यावरून परिक्षेचं काठिण्य लक्षात येईल. आयपीएस सेवेतील नोकरी ही अनेकदा त्या व्यक्तीची आवड असते. (IPS Officer Salary)

(हेही वाचा – Electric Vehicle Charging Station : ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी किती खर्च येतो?)

सातव्या वेतन आयोगानंतर आयपीएस अधिकाऱ्याला मिळणाऱ्या पगारातही वाढ झाली आहे. आयपीएस अधिकाऱ्याचा मूलभूत पगार हा ५६,१०० (भत्ता वगळता) असतो आणि डीजीपी दर्जाच्या अधिकाऱ्यासाठी हा पगार २,२५,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. आयपीएस सेवेत रँक असतात. म्हणजे पोलीस सेवेत तुम्हाला मिळणारं पद. त्यानुसार, पगार वाढत जातो. (IPS Officer Salary)

आयपीएस सेवेतील विविध पदांनुसार, पदावरील व्यक्तीला मिळणार पगार बघूया,

New Project 2024 12 28T182731.280

थोडक्यात, आयपीएस अधिकाऱ्यासाठी सुरुवातीचा पगार हा ५६,१०० रुपये मासिक इतका आहे आणि तो पदानुरुप वाढत जाऊन २,२५,००० रुपये मासिक इतका वाढू शकतो. आयपीएस अधिकाऱ्यावर जबाबदाऱ्याही असतात. परिसरात कायदा व सुव्यवस्था राखणं, हाताखालील अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवणं, नैसर्गिक किंवा बाहेरून येणाऱ्या संकटासाठी सिद्ध राहणं, महत्त्वाच्या सरकारी अधिकाऱ्यांना सुरक्षा प्रदान करणं अशी महत्त्वाची कामं आयपीएस अधिकाऱ्यांना राज्य पोलीस सेवेशी समन्वयाने करायची असतात. आयपीएस सेवेत जाण्यासाठी तुम्हाला कुठल्याही शाखेचा पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. त्याबरोबरच शारीरिक क्षमता चाचणीही द्यावी लागते. लेखी परीक्षेनंतर तुमची प्रगट मुलाखत होते. आणि त्यानंतर तुमची निवड केली जाते. ही परीक्षा युपीएससी कडून घेतली जात असल्यामुळे ती आयएएसच्या धर्तीवर ही परीक्षा होते. (IPS Officer Salary)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.