-
ऋजुता लुकतुके
आयक्यूओओ फोनची झेड १० मालिका येत्या १३ एप्रिलला भारतात लाँच होत आहे. किफायतशीर स्मार्टफोनसाठी आयक्यू ओओ कंपनी प्रसिद्ध आहे. आताही त्यांनी ग्राहकांना नाराज केलेलं नाही. नवीन फोन पुढील महिन्यात बाजारात येणार असला तरी त्याची वैशिष्ट्यं कंपनीनेच वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहेत. (IQOO Z10)
हा फोन सुरुवातीला ॲमेझॉन या ऑनलाईन वेबसाईट आणि ॲपवर ते उपलब्ध होतील. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७ चा तिसऱ्या पिढीतील प्रोसेसर असेल. आधी मीडियाटेक चिपसेट असेल अशा चर्चा सुरू होत्या. आयक्यूओक्यू झेड१० आणि आयक्यूओओ झेड९एस हे दोन्ही फोन कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहेत. त्यातून या फोन मॉडेलविषयी काही माहिती आपल्याला मिळू शकते. (IQOO Z10)
कंपनीने कॅमेराची वैशिष्ट्य हेतुपुरस्सर झाकून ठेवली आहेत. पण, मागच्या बाजूला दोन कॅमेरे असलेलं स्पष्ट दिसतंय. तर कॅमेराच्या शेजारी असलेला एलईडी फ्लॅशही ठळकपणे दिसतोय. कंपनीने फोनचे चार रंग आपल्या वेबसाईटवर दाखवले आहेत. संगमरवरी पांढरा, शेवाळी हिरवा, भगवा आणि लाल रंगातील फोन वेबसाईटवर झळकले आहेत. (IQOO Z10)
(हेही वाचा – Halonix : सीएफएल बल्ब बनवणाऱ्या हॅलोनिक्स कंपनीचे मालक नेमके कोण आहेत?)
Questers get ready for #iQOOZ10 💪💐
Coming on 🗓️ April 11, 2025 🇮🇳.📱 6.77″ FHD+ 120Hz Quad Curved OLED
🔳 Snapdragon 7s Gen 3
📸 50MP (OIS) +2MP
🤳 32MP
🔋 7300mAh (India’s Biggest Battery) 90W
⭕ Funtouch OS15
🛜 WiFi 6 | B 5.4
In Display
🤏7.89mm
⚖️ 195g@IqooInd pic.twitter.com/tkIUB9rTpJ— Wall of tech (@wall_of_tech) March 24, 2025
स्नॅपड्रॅगन ७ तिसऱ्या पिढीतील प्रोसेसर या फोनमध्ये आहे आणि फोनची बॅटरी ७३०० एमएएच अशा तगड्या क्षमतेची आहे. शिवाय फोनबरोबर ९० वॅटचा फास्ट चार्जर मिळणार आहे. त्यामुळे अर्ध्या तासात हा फोन ५५ टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकतो. तर फोनची प्रखरता ५००० नीट्स इतकी आहे. या दोन वैशिष्ट्यांमुळे हा फोन वेगळा ठरतो आणि बॅटरीची क्षमता जास्त असली तरी फोनची जाडी फारशी नाही. (IQOO Z10)
कॅमेराविषयी कंपनीने अधिकृतपणे काही सांगितलं नसलं तरी प्राथमिक कॅमेरा हा ५० मेगापिक्सेलचा सोनी सेन्सर असलेला असेल असा अंदाज आहे. त्याचबरोबर ८ मेगापिक्सेलची अल्ट्रावाईड लेन्सही या फोनमध्ये आहे. कॅमेरासाठी कंपनीने एआय फोटो एन्हान्स आणि एआय फोटो इरेज ही प्रणालीही विकसित केली आहे. हे फोन २२,००० रुपयांच्या आतील आहेत. १२८ जीबी स्टोरेज असलेला फोन हा २१,५०० रुपयांचा आहे. आणि सुरुवातीला फोनवर सवलत मिळू शकते. (IQOO Z10)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community