-
ऋजुता लुकतुके
आयक्यूओओ आणि आयक्यूओक्यू हे दोन्ही फोन भारतात ऑगस्ट महिन्यातच लाँच झाले आहेत. आता वेळ झालीय ती झेड९ टर्बो फोन भारतात अवतरण्याची. अलीकडेच चीनमध्ये आयक्यूओओ ७टर्बो हा फोन लाँच झालेला आहे.. टर्बो फोन आपल्याला चीनमधील मॉडेलवरून समजू शकतो. त्यानुसार या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७ चा तिसऱ्या पिढीतील प्रोसेसर असेल. आधी मीडियाटेक ९३०० चिपसेट आहे. तब्बल ६,४०० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. सोबतीला ८० वॅट क्षमतेचा फास्ट चार्जर देण्यात येत आहे. (IQOO Z9 Turbo)
(हेही वाचा- Women’s T20 World Cup : श्रीलंकन महिलांचा ८२ धावांनी पराभव करत भारताने राखलं टी-२० विश्वचषकातील आव्हान )
या फोनमध्येही दोन कॅमेरे असलेलं दिसतंय. यातील एक ५० मेगा पिक्सेलचा आहे. तर अल्ट्रावाईड लेन्स ८ मेगा पिक्सेलची आहे. फ्रंट कॅमेरा १२ मेगा पिक्सेलचा आहे तर कॅमेराच्या शेजारी असलेला एलईडी फ्लॅशही ठळकपणे दिसतोय. कंपनीने फोनचे चार रंग आपल्या वेबसाईटवर दाखवले आहेत. संगमरवरी पांढरा, शेवाळी हिरवा, भगवा आणि लाल रंगातील फोन वेबसाईटवर झळकले आहेत. (IQOO Z9 Turbo)
iQOO Z9 Turbo着弾 pic.twitter.com/hRSxmz5Yxd
— ミ🍜田(みた) (@mita_98_) October 8, 2024
स्नॅपड्रॅगन ७ तिसऱ्या पिढीतील प्रोसेसर या फोनमध्ये आहे. ६.७८ इंचांचा एमोल्ड डिस्प्ले फोनमध्ये आहे. कॅमेरासाठी कंपनीने एआय फोटो एन्हान्स आणि एआय फोटो इरेज ही प्रणालीही विकसित केली आहे. फोनमध्ये रॅमसाठी १२ जीबी आणि १६ जीबीचे पर्याय उपलब्ध आहेत. (IQOO Z9 Turbo)
(हेही वाचा- Ratan Tata Death : ‘एक ज्येष्ठ मित्र गमावला याचं दुःख आहेच, पण…’ राज ठाकरे यांची रतन टाटांना वाहिली शब्दांजली)
भारतात हा फोन लाँच झाल्यावर मोटोरोला एज ५० प्रो, पोको एफ ६, रिअलमी जीटी ६ टी आणि वन प्लस नॉर्ड ४ यांच्याशी असेल. चीनमधील किमतीचा आधार घेतला तर भारतात या फोनची किंमत २७,४०० रुपयांपासून सुरू होईल. पण, आतापर्यंतचं कंपनीचं धोरण पाहिलं तर सुरुवातीला आयक्यू कंपनीचे फोन हे ई – कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सवलतीच्या दरात उपलब्ध होतात. (IQOO Z9 Turbo)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community