-
ऋजुता लुकतुके
आयक्यूओओ आणि आयक्यूओक्यू हे दोन्ही फोन भारतात ऑगस्ट महिन्यातच लाँच झाले आहेत. आता नवं व्हर्जन झेड९ टर्बो भारतात दाखल झाला आहे. फोनमधील दीर्घकाळ चालणारी बॅटरी आणि ५० मेगा पिक्सेलचा कॅमेरा ही फोनची वैशिष्ट्य असतील. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७ चा तिसऱ्या पिढीतील प्रोसेसर असेल. आधी मीडियाटेक ९३०० चिपसेट आहे. तब्बल ६,४०० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. आणि सोबतीला ८० वॅट क्षमतेचा फास्ट चार्जर देण्यात येत आहे. (IQOO Z9 Turbo)
(हेही वाचा- Maharashtra Vidhan Sabha Election 2024: संजय राऊत आणि नाना पटोलेंचे सूर काही जुळेना! नव्या वादाची ठिणगी)
या फोनमध्येही दोन कॅमेरे आहेत. यातील एक ५० मेगा पिक्सेलचा आहे. तर अल्ट्रावाईड लेन्स ८ मेगा पिक्सेलची आहे. फ्रंट कॅमेरा १२ मेगा पिक्सेलचा आहे तर कॅमेराच्या शेजारी असलेला एलईडी फ्लॅशही ठळकपणे दिसतोय. कंपनीने फोनचे चार रंग आपल्या वेबसाईटवर दाखवले आहेत. संगमरवरी पांढरा, शेवाळी हिरवा, भगवा आणि लाल रंगातील फोन वेबसाईटवर झळकले आहेत. (IQOO Z9 Turbo)
Iqoo z9 Turbo plus launch date in india| Iqoo z9 Turbo plus specifications #iqooz9turboplus pic.twitter.com/KucITJ8ms5
— ABHIRAJ TECH (@Abhiraj_tech) October 6, 2024
स्नॅपड्रॅगन ७ तिसऱ्या पिढीतील प्रोसेसर या फोनमध्ये आहे. ६.७८ इंचांचा एमोल्ड डिस्प्ले फोनमध्ये आहे. कॅमेरासाठी कंपनीने एआय फोटो एन्हान्स आणि एआय फोटो इरेज ही प्रणालीही विकसित केली आहे. फोनमध्ये रॅमसाठी १२ जीबी आणि १६ जीबीचे पर्याय उपलब्ध आहेत. (IQOO Z9 Turbo)
(हेही वाचा- Muhurat Trading : जाणून घ्या यंदाच्या मुर्हूताच्या ट्रेडिंग विषयी सर्व काही )
भारतात हा फोन लाँच झाल्यावर मोटोरोला एज ५० प्रो, पोको एफ ६, रिअलमी जीटी ६ टी आणि वन प्लस नॉर्ड ४ यांच्याशी असेल. भारतात या फोनची किंमत २७,३०० रुपयांपासून सुरू होते. १६ जीबी रॅम तसंच ५१२ जीबींचं स्टोरेज असलेला फोन तुम्हाला २९,७०० रुपयांत मिळेल. फोनबरोबर सध्या ८० वॅट क्षमतेचा चार्जरही दिला जात आहे. (IQOO Z9 Turbo)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community