देखो अपना देश या मोहिमेअंतर्गत प्रवाशांना IRCTC मार्फत स्वस्त टूर पॅकेज दिले जात आहे. यामुळे प्रवाशांना बजेटमध्ये आपला देश फिरण्याची संधी मिळणार आहे. या योजनेमुळे हौशी पर्यटक स्वस्तात दक्षिण भारत फिरू शकतात.
( हेही वाचा : चेंबूरच्या महर्षी दयानंद सरस्वती मार्गावरील पदपथावरील तो खाऊचा स्टॉल्स हटवला)
कोणत्या ठिकाणांना देता येणार भेट?
साउथ इंडिया डिवाइन एक्स राजकोट या पॅकेजद्वारे पर्यटकांना तिरुपती, कन्याकुमारी, रामेश्वरम आणि मदुराईला भेट देता येणार आहे. टूर पॅकेजचा खर्च २६ हजारांपासून सुरू होऊन प्रवाशांना जेवण आणि फिरण्यासाठी बसची सुविधा देण्यात येणार आहे. या टूर पॅकेजची सुरूवात ११ मार्च २०२३ रोजी होणार आहे. प्रवाशांना थर्ड एसीमधून प्रवास करता येणार आहे. यामध्ये नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण याचा समावेश असेल.
आयआरसीटीसीने आपल्या ट्विटरवरून हे टूर पॅकेज जाहीर केले आहे. हा संपूर्ण प्रवास ९ रात्री आणि १० दिवसांचा असेल. हे पॅकेज ११ मार्च २०२३ रोजी राजस्थानच्या सिकर येथून सुरू होईल. हा प्रवास भारत गौरव टूरिस्ट ट्रेनमधून करण्यात येणार आहे. या विशेष ट्रेनमध्ये प्रवास करणारे प्रवासी सिकर, जयपूर, सवाई मधोपूर आणि कोटा स्थानकांमधून आपला प्रवास सुरू करू शकतात.
टूर पॅकेजबद्दल माहिती
- पॅकेजचे नाव – दक्षिण भारत यात्रा
- पर्यटन स्थळे – तिरुपती, मल्लिकरजुना, रामेश्वरम, मदुराई आणि कन्याकुमारी
- टूर किती काळ असेल – ९ रात्री १० दिवस
- टूरची सुरुवार – ११ मार्च २०२३
- ट्रॅव्हल मोड – ट्रेन
- बोर्डिंग/डेबोर्डिंग – सिकर, जयपूर, सवाई मधोपूर आणि कोटा
बुकिंग कुठे कराल?
irctctourism.com ला भेट देत प्रवासी आपल्या सहलीचे ऑनलाईन बुकिंग करू शकतात. याशिवाय IRCTC टुरिस्ट फॅसिलिटेशन सेंटर, झोनल ऑफिस आणि रिजनल ऑफिसमधून बुकिंग करता येईल.
Join Our WhatsApp CommunityDiscover a more rewarding way to travel with #IRCTC #bharatgauravtrain. Take the Dakshin Bharat Yatra and explore the beautiful south in a way never before😍😍 https://t.co/EWl3ouCEv0@AmritMahotsav @incredibleindia @tourismgoi #AzadiKiRail
— IRCTC Bharat Gaurav Tourist Train (@IR_BharatGaurav) February 28, 2023