भारतीय रेल्वेने रोज लाखो नागरिक प्रवास करतात. तुम्ही सुद्धा रेल्वे प्रवासाला पसंती देत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची माहिती आहे. IRCTC ने अॅप व वेबसाइटच्या माध्यमातून तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केला आहे.
या नव्या नियमांनुसार तिकिटांचे आरक्षण करताना तुम्हाला तुमचे IRCTC अकाऊंट व्हेरिफाय करावे लागणार आहे. तिकीट बुकिंग करण्यासाठी तुम्हाला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे. कोरोना काळानंतर आयआरसीटीने अनेक नियमांमध्ये बदल केलेला आहे. नव्या नियमांनुसार जर तुम्ही दीर्घकाळ तिकीटांची बुकिंग केली नसेल तर सर्वप्रथम व्हेरिफिकेशन प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करणे आवश्यक आहे.
( हेही वाचा : हॉटेलमधील सेवा नि:शुल्कच; Service Tax चा आग्रह केल्यास येथे करा तक्रार )
IRCTC अॅप किंवा वेबसाइटवर व्हेरिफिकेशन प्रक्रिया
- IRCTC च्या अॅपवर तुम्ही व्हेरिफिकेशन या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा IRCTC च्या अकाऊंटला रजिस्टर असणाऱ्या मोबाईल क्रमांक व ई-मेल समाविष्ट करून व्हेरिफाय बटणावर क्लिक करा.
- व्हेरिफाय केल्यावर तुम्हाला मोबाईलवर ओटीपी येईल. अशाच पद्धतीने ईमेलवर सुद्धा तुम्हाला कोड येईल हे क्रमांक समाविष्ट केल्यावर तुमचे अकाऊंट व्हेरिफाय होईल.
- या संपूर्ण प्रक्रियेनंतर तुम्हाला रेल्वे तिकीट ऑनलाईन बुक करता येणार आहे.
- तसेच IRCTC ला आधार कार्ड लिंक केल्यावर तुम्ही महिन्याला १२ ऐवजी २४ तिकीट बुक करू शकता. ज्या अकाऊंटला आधार लिंक नाही अशा अकाऊंटवरून फक्त १२ तिकीटे बुक करता येणार आहे.