IRCTC अंतर्गत विविध टूर्सचे आयोजन केले आहे. देशवासीयांना तीर्थक्षेत्रांना भेट देता यावी यासाठी भारतीय रेल्वे विविध टूर पॅकेज जाहीर करते. IRCTC ने नुकतेच चारधाम यात्रेसाठी आझादीरेल आणि देखो अपना देश अंतर्गत स्वस्त-मस्त टूर पॅकेज ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहेय. ११ रात्री आणि १२ दिवसांचे IRCTC चे हे चार धाम यात्रा पॅकेज असून यामध्ये विविध क्लासनुसार भाडेदर आकारण्यात आले आहेत.
( हेही वाचा : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२३ : भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान… तरच टीम इंडियाला मिळेल WTC फायनल खेळण्याची संधी)
या ठिकाणांना भेट देण्याची संधी
हरिद्वार, बरकोट, जानकीचट्टी, उत्तरकाशी, गंगोत्री, गुप्तकाशी, सोनप्रयाग, केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री या ठिकाणांचे दर्शन दिले जाणार आहे.
१४ मे २०२३ पासून यात्रेला सुरूवात
१४ मे २०२३ रोजी मुंबई येथून चारधाम यात्रेला सुरूवात होणार आहे. प्रवाशांना येथून विमानाने दिल्लीला आणले जाणार आहे. यानंतर दिल्लीहून हरिद्वार, बरकोट, गंगोत्री, गुप्तकाशी, जानकीचट्टी, केदारनाथ, यमुनोत्री, सोनप्रयाग, उत्तरकाशी आणि बद्रीनाथपर्यंत रस्तेमार्गाने नेण्यात येईल. IRCTC च्या या पॅकेजमध्ये निवास व्यवस्थेसोबत नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्थी केली जाणार आहे. यासोबत प्रवासासाठी बस, टॅक्सी, ट्रेन आणि विमान सेवेचा वापर करण्यात येणार आहे. तीर्थक्षेत्रांवर IRCTC चा मार्गदर्शक सुद्धा उपलब्ध असणार आहे.
कुठे कराल बुकिंग
IRCTC ने ट्विटरवर या यात्रेबाबत तपशील शेअर केले आहेत. तुम्ही 8287931886 किंवा www.irctctourism.com या अधिकृत वेबासाईटला भेट देऊन तुमच्या यात्रेचे बुकिंग करू शकता. पर्यटकांची राहण्याची व्यवस्था स्टॅटर्ड हॉटेल्स किंवा गेस्ट हाऊसमध्ये केली जाणार आहे.
विभागवार भाडेदर (क्लास)
- सिंगल – ६९ हजार १११ रुपये प्रतिव्यक्ती
- ट्विन – ५२ हजार १११ रुपये प्रतिव्यक्ती
- ट्रिपल – ५१ हजार १११ रुपये प्रतिव्यक्ती
- लहान मुले ( बेडसुविधा ५ते११ वर्ष) – ४५ हजार १११ रुपये
- लहान मुले ( बेड सुविधेशिवाय ५ ते ११ वर्ष ) – ३७ हजार ५११ रुपये
- लहान मुले ( २-४ वर्ष) – १३ हजार ५११ रुपये
Join Our WhatsApp CommunityEmbark on the journey to the land of Gods with #IRCTC. With our best #Chardhamyatra tour packages, you can visit all four shrines hassle-free and in a very well-scheduled manner. Book : https://t.co/Snk8n3P47r@AmritMahotsav @incredibleindia @tourismgoi #bharatparv23 #AzadiKiRail
— IRCTC (@IRCTCofficial) February 3, 2023