११ दिवस दक्षिण भारत फिरा, मग पैसे भरा! IRCTC च्या EMI टूर पॅकेजबद्दल जाणून घ्या…

179

आपल्याकडे पुरेसे पैसे उपलब्ध नसले किंवा आर्थिक अडचण असल्यास आपण EMI चा आधार घेत वस्तू खरेदी करतो. अगदी त्याचप्रमाणे भारतीय रेल्वेने सुद्धा EMI आधारित टूर पॅकेज डिझाईन केले आहे. IRCTC ने दक्षिण भारत विशेष पॅकेज जाहीर केले आहे. प्रवासी प्रवासापूर्वी संपूर्ण रक्कम खर्च न करता EMI द्वारे रेल्वेला पैसे देऊ शकतात. या पर्याय फक्त तिरुपती सहलीसाठी उपलब्ध असणार आहे. हळूहळू EMI आधारित इतर पॅकेज सुद्धा IRCTC मार्फत लवकरच डिझाईन केले जाणार आहेत.

( हेही वाचा : आफताबचे ७० तुकडे करा; त्याची आमच्या मालमत्तेवर नजर होती…श्रद्धाच्या वडिलांचा खुलासा )

दक्षिण भारत पॅकेजमध्ये कोणती ठिकाणे पाहता येतील?

स्वदेश दर्शन स्पेशल टुरिस्ट ट्रेन पॅकेज अंतर्गत प्रवाशांना तिरुपती, रामेश्वरम, कन्याकुमारी, मदुराई आणि मल्लिकार्जुन या ठिकाणांना भेटी देता येतील. IRCTC च्या अधिकृत वेबसाईटद्वारे तुम्ही या टूरचे बुकिंग करू शकतात. तसेच ज्यांच्याकडे पैसे नाहीत ते प्रवासी हप्त्यांमध्ये रेल्वेला पैसे देऊ शकतात जेणेकरून प्रवाशांना इच्छित स्थळी प्रवास करता येईल.

दक्षिण भारत दौरा

१० रात्री ११ दिवसांच्या या दक्षिण भारत टूरमध्ये स्लीपर क्लासमधून प्रवास करणाऱ्यांना प्रति व्यक्ती २० हजार ९०० रुपये, 3AC क्लासमध्ये प्रति व्यक्ती ३४ हजार ५०० रुपये आणि 2AC क्लासमध्ये प्रति व्यक्ती ४३ हजार रुपये एवढे भाडेदर असणार आहे. जे पैसे भरण्यास असमर्थ आहेत, अशा लोकांसाठी ईएमआय (EMI) सुविधा आहे. डाऊन पेमेंट केल्यानंतर, ग्राहकाच्या आर्थिक क्षमतेनुसार IRCTC कडून हप्ता निश्चित केला जाणार आहे.

पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक

दक्षिण भारत टूर १५ मार्च ते २५ मार्च २०२३ या दरम्यान असणार आहे. या संदर्भात इतर महत्त्वाच्या माहितीसाठी, तुम्ही 24×7 IRCTC हेल्पलाइन (8595904082 किंवा 8595938067) क्रमांकावर संपर्क करू शकता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.