IRCTC कडून प्रवाशांना भन्नाट ऑफर! फिरायला जाताना ६०० रुपयांपासून बुक करा सुंदर हॉटेल्स

172

ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान किंवा लागोपाठ सुट्ट्या आल्या की, अनेकजण विविध ठिकाणी फिरण्याचे नियोजन करतात. भारतीय रेल्वेचे जाळे संपूर्ण देशभरात पसरले असल्याने पर्यटक रेल्वेने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझमने (IRCTC)आपल्या पर्यटक प्रवाशांना उत्तम निवासस्थान व्यवस्था देण्याचा करार केला आहे.

( हेही वाचा : नववर्षाचे गिफ्ट! मुंबईपाठोपाठ पुण्यातही धावणार डबल डेकर बस? )

IRCTC चे हॉटेल पॅकेज 

कुटुंबासमवेत प्रवास करताना राहण्यासाठी मनासारखे हॉटेल हवे असले तर खूप पैसे मोजावे लागतात. चांगल्या हॉटेलचे दरही जास्त असतात. यामुळे IRCTC ने एक नवे पॅकेज लॉंच केले आहे. यानुसार तुम्हाला राहण्याची उत्तम सोय कमीत कमी पैशांमध्ये करता येईल.

प्रवासादरम्यान तुम्ही हॉटेलच्या शोधात असाल तर www.hotel.irctctourism.com या वेबसाईटवर चांगल्या दर्जाची हॉटेल्स कमी खर्चात तुम्हाला बुक करता येतील. जर तुम्ही IRCTC च्या वेबसाईटवरून ऑनलाईन हॉटेल बुक केले तर अधिक सवलतीच्या दरात तुम्ही राहण्याची व्यवस्था करू शकता.

www.hotel.irctctourism.com या वेबसाईटवर तुम्ही हॉटेल बुक केले तर कॅन्सलेशनची सुविधा २४ तास आधी देण्यात येईल. जर फिरायला जाण्याच्या काही दिवस आधी तुम्ही बुकिंग केले असेल तर तुम्हाला अधिक सवलतीच्या दरात चांगले पॅकेज मिळू शकते. या पॅकेजद्वारे तुम्ही निसर्गाच्या सानिध्यातील सुंदर अशा हॉटेल्समध्ये राहण्याचा अनुभवही घेऊ शकता.

IRCTC ने केले ट्वीट

सध्या १३५ हून अधिक शहरात प्रवासी IRCTC च्या हॉटेलमध्ये राहण्याचा आनंद घेऊ शकतात. IRCTC च्या रुमच्या किंमती एका रात्रीसाठी ६०० रुपयांपासून सुरू होत असल्याची माहिती IRCTC ने या ट्वीटमध्ये दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.