Travel Insurance: अवघ्या 1 रुपयात मिळवा प्रवास विमा! वाचा काय आहे योजना?

176

आपल्या देशात लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बहुतेक लोक रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. कमी भाडे हे त्यामागचे सर्वात मोठे कारण आहे. सहसा प्रवासी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ट्रेनमधील स्लीपर किंवा इतर आरक्षण करतात. हे आरक्षण दोन प्रकारे केले जाते. एक म्हणजे ऑनलाइन आणि दुसरे ऑफलाइन. कमी बजेटमध्ये आरक्षण झाल्यानंतर प्रवासी अगदी आरामात झोपून आपल्या तुमच्या गंतव्य, इच्छित स्थानी पोहोचतो. मात्र ट्रेन प्रवासादरम्यान उपलब्ध असलेल्या अशा एका सुविधेबद्दल सांगणार आहोत, ज्याकडे लोकं अनेकदा दुर्लक्ष करतात.

ही सुविधा म्हणजे रेल्वेने प्रवास करणार्‍या लोकांना प्रवास विमा दिला जातो. रेल्वे वेबसाइट, अॅप किंवा इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून तिकीट बुक करताना, तुम्हाला प्रवास विम्याचा पर्याय उपलब्ध होतो. यामध्ये तुम्हाला एक रुपया किंवा त्यापेक्षा कमी खर्चाचा प्रवास विमा दिला जात असल्याचा दावा केला जातो. बहुतेक लोक या विम्याचा पर्याय निवडत नाहीत. तुम्ही हा पर्याय निवडल्यास रेल्वे प्रवासादरम्यान झालेला कोणताही अपघात आणि त्यामुळे तुमचे होणारे नुकसान या बदल्यात रेल्वेकडून आर्थिक मदत दिली जाते. एसबीआय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड आणि लिबर्टी जनरल इन्शुरन्स लिमिटेड रेल्वेच्या वतीने हा प्रवास विमा देते.

(हेही वाचा – Indian Currency: भारतीय नोटेवर कोणाचं चित्र किंवा फोटो छापले जाणार, हे कोण ठरवतं?)

प्रवासी विम्याचा पर्याय निवडणाऱ्या रेल्वे प्रवाशाचा मृत्यू झाल्यास, रेल्वे त्याच्या कुटुंबाला 10 लाखांपर्यंतची आर्थिक मदत करते. यासोबतच अपघातात अपंग झालेल्या प्रवाशाला आर्थिक मदत म्हणून 10 लाख रुपये रेल्वेकडून दिले जातात. अपघातामुळे अंशतः अपंगत्व आल्यास रेल्वेकडून प्रवाशांना 7,50,000 रुपये द्यावे लागतात. अपघातातील गंभीर जखमींना 2,00,000 रुपये आणि किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांच्या उपचारासाठी 10 हजार रुपये रेल्वेकडून दिले जातात. म्हणजेच जर तुम्ही ट्रेनमधून प्रवास करताना अपघाताला बळी पडलात तर तुम्हाला रेल्वेकडून आर्थिक भरपाई दिली जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.