ट्रेनच्या तिकिटावर कोण-कोणते शुल्क आकारले जातात? जाणून घ्या…

116

रेल्वे हा देशातील सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. दररोज लाखो प्रवासी त्यांच्या ईच्छीत स्थळावर पोहोचण्यासाठी रेल्वेने प्रवास करतात. बसायला जागा मिळावी म्हणून हे प्रवासी अनेक महिन्यांपूर्वीच प्रवासाचे नियोजन करून रिझर्व्हेशन करतात. आजकाल बहुतांश लोक रेल्वेचे आरक्षण फक्त ऑनलाइनच करतात. त्यावेळी रेल्वे प्रवाशांकडून विविध प्रकारचे चार्जेस देखील घेतले जातात. हे शुल्क कोणकोणते असतात, जाणून घ्या.

ट्रेनमध्ये रिझर्वेशन करताना, रेल्वे प्रवाशांकडून मूळ भाड्याव्यतिरिक्त, रिझर्वेशन चार्ज, जीएसटी, केटरिंग चार्ज, सुपर फास्ट चार्ज (जर तुमची ट्रेन सुपरफास्ट असेल), डायनॅमिक चार्ज यांसारखे अनेक चार्जेस सामिल केले जातात. यासोबतच ट्रेनचे मूळ भाडे तुम्ही कोणत्या क्लासमध्ये प्रवास करत आहात यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर, गुवाहाटी ते नवी दिल्ली दरम्यान धावणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसमध्ये 3 AC मध्ये प्रवास करण्यासाठी, तुम्हाला 3,770 रुपये शुल्क भरावे लागेल.या भाड्यात तुम्हाला मूळ भाडे 2007 रुपये, रेल्वे रिझर्वेशन चार्जेस 40 रुपये, ट्रेन सुपरफास्ट चार्ज 45 रुपये, केटरिंग चार्ज 710 रुपये, जीएसटी चार्ज 146 रुपये, डायनॅमिक फेअर चार्ज रुपये 803 रुपये द्यावे लागतील. या प्रकरणात, ट्रेनचे एकूण भाडे रु.3770 असेल. हे भाडे राजधानीसारख्या प्रीमियम ट्रेनचे आहे. शताब्दी, तेजस, दुरांतो गाड्यांचे भाडे आणि मूळ भाडे जास्त आहे.

(हेही वाचा देशात कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट 5.63 टक्क्यांवर पोहचला)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.