लागोपाठ सुट्ट्या आली की, संपूर्ण कुटुंबासोबत कुठेतरी फिरायला जाण्याची सगळ्यांचीच इच्छा असते. पण अनेकदा टूर पॅकेजची किंमत सर्वसामान्य माणसाच्या खिशाला न परवडणारी असते. त्यामुळे कुटुंबासोबत फिरायला जायची इच्छा अपूर्ण राहते. पण आता देशातच काय तर परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. आयआरसीटीसीच्या ‘या’ टूर पॅकेजमुळे आता अगदी स्वस्तात नेपाळ फिरून येणे आता शक्य होणार आहे.
( हेही वाचा : Mumbai-Pune Express Way : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ११ वाहने एकमेकांवर आदळली )
IRCTC टूर पॅकेजबद्दल माहिती
- पॅकेजचे नाव – बेस्ट ऑफ नेपाल
- प्रवास सुरू होणार – दिल्ली विमानतळ
- पर्यटन स्थळे – काठमांडू, पोखरा
- कालावधी – सहा दिवस, पाच रात्री
- ट्रॅव्हल मोड – बाय एअर
- सहलीची सुरूवात – २० मे २०२३
( हेही वाचा : IRCTC चे बजेट टूर पॅकेज! स्वस्तात फिरता येणार दक्षिण भारत, कसा असेल १० दिवसांचा प्रवास?)
व्हिसा आवश्यक?
परदेशात जाण्यासाठी व्हिसाची गरज असते. व्हिसा मिळवण्याची प्रक्रिया अनेकदा वेळ खाऊ आणि कंटाळवाणी असू शकते. परंतु जर तुम्ही या सहलीला जायचा विचार करत असाल तर व्हिसावाचून तुमचे काहीही अडणार नाही. कारण भारतीय नागरिक फक्त ‘आधार कार्ड’ दाखवून नेपाळमध्ये प्रवेश करू शकतात.
बुकिंग करणे एकदम सोपे
२० मे ला सुरू होणाऱ्या “बेस्ट ऑफ नेपाल” या टूरला जायला उत्सुक असाल तर आताच जागा बुक करा! फक्त ३० जागा उपलब्ध आहेत. एकटे जात असाल तर ४५,५०० रूपये मोजावे लागतील. जर दोन जणांसाठी टूर बुक करत असाल तर प्रत्येकी ३६,९९९ रूपये मोजावे लागतील. irctctourism.com ला भेट देऊन सहलीचे ऑनलाईन बुकिंग करता येईल.
सर्वसामान्य माणसाची भारतातील अध्यात्मिक ठिकाणांना भेट देण्याची इच्छा IRCTC च्या पुढील पॅकेजेसमुळे पूर्ण होणार आहे :
- दक्षिण भारत शुभ यात्रा,
- अयोध्या राम मंदिर
- शिर्डी साई दर्शन
- उत्तर भारत देवभूमी दर्शन
- पुण्यक्षेत्र यात्रा
Heard a lot about Kathmandu’s bustling nightlife? It's time to enjoy the same. Enjoy the best of Nepal with IRCTC's Nepal Tour Package.
Book Today! https://t.co/pZoWwtr3f5@AmritMahotsav @incredibleindia @tourismgoi #azadikirail
— IRCTC (@IRCTCofficial) April 24, 2023
हेही पहा :
Join Our WhatsApp Community