देखो अपना देश या मोहिमेअंतर्गत प्रवाशांना IRCTC मार्फत स्वस्त टूर पॅकेज दिले जात आहे. यामुळे प्रवाशांना बजेटमध्ये आपला देश फिरण्याची संधी मिळणार आहे. या योजनेमुळे हौशी पर्यटक स्वस्तात दक्षिण भारत फिरू शकतात.
( हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘एक्झाम वॉरियर्स’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन )
कोणत्या ठिकाणांना देता येणार भेट?
- साउथ इंडिया डिवाइन एक्स राजकोट या पॅकेजद्वारे पर्यटकांना तिरुपती, कन्याकुमारी, रामेश्वरम आणि मदुराईला भेट देता येणार आहे. टूर पॅकेजचा खर्च १३ हजारांपासून सुरू होऊन प्रवाशांना जेवण आणि फिरण्यासाठी बसची सुविधा देण्यात येणार आहे. या टूर पॅकेजची सुरूवात २४ जानेवारी २०२३ रोजी गुजरातमधील राजकोटमधून होणार आहे.
- प्रवाशांना थर्ड एसीमधून प्रवास करता येणार आहे. यामध्ये नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण याचा समावेश असेल.
किती दिवसांचा प्रवास असेल?
हा संपूर्ण प्रवास ८ रात्री आणि ९ दिवसांचा असणार आहे. या पॅकेजमध्ये IRCTC मार्फत सर्व व्यवस्था करण्यात येणार आहे. हा प्रवास स्वदेश दर्शन टुरिस्ट ट्रेनमधून होणरा आहे. या विशेष ट्रेनमध्ये प्रवास करणारे प्रवासी राजकोट, साबरमती, वडोदरा, कल्याण, पुणे या स्थानकांवरून आपला प्रवास सुरू करु शकणार आहेत.
शुल्क किती ?
- इकॉनॉमी टूर पॅकेज – १३ हजार ९०० रुपये प्रतिव्यक्ती
- स्टॅंडर्ड कॅटगरी पॅकेज – १५ हजार ३०० रुपये प्रतिव्यक्ती
- कंफर्ट कॅटगरी पॅकेज – २३ हजार ८०० रुपये प्रतिव्यक्ती
बुकिंग कुठे कराल?
irctctourism.com ला भेट देत प्रवासी आपल्या सहलीचे ऑनलाईन बुकिंग करू शकतात. याशिवाय IRCTC टुरिस्ट फॅसिलिटेशन सेंटर, झोनल ऑफिस आणि रिजनल ऑफिसमधून बुकिंग करता येईल.