५० हजारात थायलंड-बॅंकॉक फिरण्याची सुवर्णसंधी! IRCTC कडून विशेष टूरचे आयोजन

नववर्षात तुम्ही परदेश भ्रमंतीचा विचार करणार असाल तर IRCTC ने तुमच्यासाठी विशेष ऑफर सादर केली आहे. थायलंड थ्रिलिंग या स्पेशल टूरचे आयोजन IRCTC कडून करण्यात आले आहे. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबासमवेत विदेश सफर करायची असले तर तुम्ही कमी खर्चात तुमच्या ट्रीपचे नियोजन करू शकता.

( हेही वाचा : ट्रेनमध्ये सहज बदला तुमची सीट! स्लीपर कोचमधून एसीतही करता येईल प्रवास, जाणून घ्या रेल्वेचे नियम)

काय आहे IRCTC चे पॅकेज

  • IRCTC च्या या नव्या ऑफरमध्ये तुम्हाला ५ रात्री आणि ६ दिवसांचे पॅकेज मिळणार आहे.
  • यात तुम्हाला थायलंड, बॅंकॉक, पटाया फिरायची संधी मिळणार आहे.
  • ही टूर ३१ जानेवारी २०२३ पासून सुरू होणार आहे.
  • या पॅकेजमध्ये रेल्वेकडून राहण्या-खाण्याची व्यवस्था सुद्धा केली जाणार आहे.
  • ज्या हॉटेलला राहण्याची सोय केली जाईल तिथून पुढे जाण्यासाठी वाहन सोयदेखील करण्यात येणार आहे.
  • टूरसोबत कायमस्वरुपी गाई़ड प्रवाशांसोबत असेल.

दर किती असणार ?

  • थायलंड थ्रिलिंग टूरसाठी प्रतिव्यक्ती ५४ हजार ४१० रुपये एवढा खर्च येणार आहे.
  • जर दोघे किंवा त्यापेक्षा अधिक लोक एकत्र प्रवास करणार असतील तर प्रतिव्यक्ती ४६ हजार १०० रुपये खर्च होईल.
  • संपर्क क्रमांक – 8595937727/ 8595937732
  • अधिकृत वेबसाईट – www.irctctourism.com

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here