श्रद्धा की अंधश्रद्धा? लटकल्यावर खरोखर लहान मुलांची उंची वाढते का?

लहानपणी आपल्याला मोठ्या माणसांकडून बरंच काही सांगितलं जातं. कधीकधी आपलं लक्ष वळवण्यासाठी, आपल्याला भिती दाखवण्यासाठी किंवा भिती घालवण्यासाठी मोठी माणसं उगाच काहीतरी सांगायचे. बागुलबुवा आला, तो बघ काऊ, बाप्पा कान कापेल वगैरे वगैरे…

आणखी एक गोष्ट म्हणजे उंची वाढत नाहीये ना, मग लटकत रहा. लहानपणी लटकल्यावर उंची वाढते असं वाटायचं. परंतु मोठं झाल्यावर कळतं की लटकून काहीच फायदा झाला नाही. मग खरोखर लटकल्यावर उंची वाढते का? की मुलांची फजिती करण्यासाठी मोठी माणसं असं बोलतात? मुळात मोठ्यांना तरी सत्य माहिती आहे का?

(हेही वाचा चलो राणीबाग…पाना फुलांचे कार्टून्स बघायला)

लोक उंची वाढवण्यासाठी बरी खटपट करतात. काही लोक तर आपल्या मुलांना सप्लिमेंट्स देखील देतात, जिम्नॅशियम किंवा इतर गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन देतात. उंची म्हणजे व्यक्तिमत्वाचा महत्वाचा घटक. माणूस बुटका असेल तर त्याला न्यूनगंड होतो, त्याचं व्यक्तिमत्व उठून दिसत नाही. म्हणून उंची वाढवण्यावर अनेकांना भर असतो.

आता लटकल्यावर खरोखर उंची वाढते का हे पाहुया. खरंतर लटकणे किंवा पुल अप केल्याने उंची वाढते असं म्हणतात. हे अगदीच खरं किंवा अगदीच खोटं नाही. लटकल्यावर तुमच्या बाहू, छाती आणि पाठ ताणली जाते. लहान वयातच हा सराव केल्याने मुलांचं पोश्चर सरळ राहतं.

(हेही वाचा भारताला आगामी 24 वर्षांत इस्लामिक देश बनवण्याचा कट)

बर्‍याचदा थोडसं वाकून किंवा पोक काढून चालल्याने आपली उंची कमी दिसते. लटकल्याने आपलं पोश्चर चांगलं राहतं आणि आपण उंच तर दिसतो त्याचबरोबर रुबाबदारही दिसतो. आपली उंची ही अनुवांशिक असते, आपल्या आहारशास्त्रावर आधारित असते. व्यायाम केल्याने आपली प्रकृती चांगली राहते, त्याचप्रमाणे लटकण्याचा व्यायाम केल्या आपलं पोश्चर सुधारुन आपण उंच दिसतो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here