आधार कार्ड भारतीय नागरिकांचे महत्वाचे ओळखपत्र आहे. अलिकडे शाळेत प्रवेश घेण्यापासून, बॅंकेचे कामकाज, सिम कार्ड खरेदी करताना, पासपोर्ट काढताना अशा सर्व महत्वाच्या कामकाजात आधार कार्ड अनिवार्य असते. अलिकडे आधार कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. म्हणूनच आधार कार्ड जारी करणारी संस्था UIDAI ने महत्त्वाची घोषणा केली आहे. यामुळे तुमचे आधार कार्ड बनावट आहे की खरे यासंदर्भात तुम्हाला माहिती मिळेल.
( हेही वाचा : गिरणी कामगारांच्या घरांच्या किंमतीत होणार वाढ ? )
#BewareOfFraudsters
All 12-digit numbers are not #Aadhaar. It is recommended that the Aadhaar should be verified before accepting it as identity proof. Click: https://t.co/DwNgEcmVZ9 and verify it online in 2 simple steps. pic.twitter.com/JIT9NVpGxG— Aadhaar Office Delhi (@UIDAIDelhi) April 25, 2022
तुमचे आधार कार्ड बनावट आहे की खरे हे चेक करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा…
- तुमचे आधार कार्ड बनावट आहे की खरे हे ओळखण्यासाठी सर्वप्रथम यूआडीएआयची अधिकृत वेबसाइट uidai.gov.in ला भेट द्या.
- यानंतर माय आधार (My Aadhaar) पर्यायावर क्लिक करा.
- व्हेरिफाय आधार हा पर्याय निवडा ( Verify Aadhaar).
- यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागेल.
- कॅप्चा टाकल्यावर तुमचा मोबाइल क्रमांक टाका.
- तुम्हाला याठिकाणी आधार क्रमांक, वय, लिंग, राहते राज्य याची माहिती नमूद केलेली दिसल्यास तुमचे आधार वैध आणि खरे आहे आणि ही माहिती नमूद केलेली नसल्यास तुमचे आधार कार्ड बनावट आहे हे सिद्ध होईल.