
-
ऋजुता लुकतुके
भारताचे आघाडीचे उद्योगपती मुकेश व नीता अंबानी (Nita Ambani) यांची एकुलती एक मुलगी ईशा अंबानी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतेच शिवाय तिने वडिलांकडून उद्योजकतेचाही वारसा घेतला आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि रिलायन्स रिटेलमध्ये (Reliance Retail) ती जबाबदारीच्या पदावर आहे. तर रिटेल उद्योगाच्या विस्तारावरही तिची बारीक नजर आहे. मुंबईतील नीता मुकेश अंबानी (Mukesh Ambani) कल्चरलल सेंटरमध्येही ही कार्यरत आहे. (Isha Ambani Net Worth)
मुंबईत धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर ईशाने अमेरिकेत येल विद्यापीठातून तिने मानसशात्र आणि दक्षिण आशियाई स्टडीज् मध्ये तिने स्नातक पदवी घेतली आहे. तर स्टॅनफोर्डमधून तिने एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ईशा अमेरिकेत मॅकेन्सी अँड कंपनी न्यूयॉर्क इथं काम करत होती. त्यानंतर २३ व्या वर्षी ती रिलायन्स समुहात काम करू लागली. (Isha Ambani Net Worth)
(हेही वाचा – Maharashtra Temperature : यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची चाहूल; यंदाचा उन्हाळा किती कडक?)
त्यानंतर ईशाकडे रिलायन्स समुहातील रिटेल उद्योग सोपवण्यात आला आहे. ईशा अंबानीची एकूण मालमत्ता ही ८३५ कोटी रुपये इतकी आहे. रिलायन्स रिटेल्सची (Reliance Retail) संचालक म्हणून ती वार्षिक साडेचार कोटी रुपये मेहनताना घेते. डिसेंबर २०१८ मध्ये ईशाचं लग्न पिरामल समुहातील अर्थविषयक उद्योगाचे संचालक आनंद पिरामल यांच्याशी झालं आहे. या दोघांना कृष्णा व आदिया अशी दोन जुळी मुलं आहेत. (Isha Ambani Net Worth)
ईशा अंबानीच्या मालकीच्या महागड्या वस्तू
ईशा आणि आनंद पिरामल मुंबईत वरळी इथं एका भल्यामोठ्या बंगल्यात राहतात. या बंगल्याची किंमत ४५० कोटी रुपये इतकी आहे. आनंदचे पालक अजय आणि स्वाती पिरामल यांनी लग्नाची भेट म्हणून ईशा, आनंद यांना हे घर भेट दिलं होतं. बंगल्याचं नाव ग्युटिला असं आहे. आणि ते ५०,००० वर्ग फुटांचं आहे. (Isha Ambani Net Worth)
(हेही वाचा – Mahakumbh बद्दल अफवा पसरवणे महागात पडणार ; 54 सोशल मीडिया अकाउंट्सविरुद्ध एफआयआर दाखल)
ईशा अंबानीकडे असलेली हर्मिस मिनी केली हँडबॅग ही तब्बल ३१ लाखांची आहे. तिच्याकडे असलेली आणखी एक चॅनल डॉल बॅगही २४ लाखांची आहे. एमईटी गाला इथं ही बॅग तिने घेतली होती. ईशा आणि आनंद पिरामल यांच्याकडे बेन्टली या लक्झरी कारबरोबरच इतरही महागड्या गाड्या आहेत. मर्सिडिझ सी क्लास गाडी ईशा नियमितपणे वापरताना दिसते.
ईशा अंबानीकडे १६५ कोटी रुपयांचा एक नेकलेस आहे जो तिने मेहंदी कार्यक्रमात सगळ्यात पहिल्यांदा वापरला होता. त्यानंतर नीता मुकेश सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटनाला तिने तो परत एकदा वापरला होता. हा नेकलेस नीता अंबानी (Nita Ambani) यांनी खास तयार करून घेतला आहे. आणि भारतातील महागड्या नेकलेस पैकी हा एक आहे. (Isha Ambani Net Worth)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community