स्मार्टफोनवर कॉल रेकॉर्ड करण्याला येणार मर्यादा

135

अलिकडे प्रत्येकाकडे आपल्याला महागातले स्मार्टफोन पहायला मिळतात. या स्मार्टफोनमध्ये अनेक नवनवीन फिचरचा समावेश केलेला असतो. तर जे फिचर स्मार्टफोन नसतात ते अ‍ॅप्स युजर्स गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घेतात. तुम्हीही अशाचप्रकारे कॉल रेकॉर्डिंगचे अ‍ॅप्स डाउनलोड केले असतील तर ११ मे पासून हे अ‍ॅप्स बंद केले जात आहेत.

( हेही वाचा : गुगलमध्ये ‘हे’ सर्च कराल तर थेट जेलमध्ये जाल )

कॉल रेकॉर्ड करण्याची सुविधा असलेले सगळे Android अ‍ॅप्स ११ मे पासून बंद होणार आहेत. गुगल प्ले स्टोअर पॉलिसीमध्ये बदल झाल्यामुळे आता Android फोनवर कॉल रेकॉर्ड करणारे अ‍ॅप्स काम करणार नाहीत. असे गुगलने प्ले स्टोअरमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

कॉल रेकॉर्डिंग अ‍ॅप्स बंद

Android युजर्स Truecaller सारख्या अ‍ॅप्सवर सुद्धा कॉल रेकॉर्डिंग सुविधा वापरू शकणार नाहीत. कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅप्सद्वारे तुमच्या Android स्मार्टफोनवर कॉल रेकॉर्ड होऊ शकणार नाहीत. परंतु तुमच्या स्मार्टफोनमधील कंपनीमार्फत पुरवल्या जाणाऱ्या अर्थात युजर्स इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंग अ‍ॅप्स वापरू शकतात. Xiaomi, Samsung आणि Google Pixel स्मार्टफोनमध्ये इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंग फिचर देण्यात आले आहे. Google Android 10 आधारित स्मार्टफोनमध्ये, कॉल रेकॉर्डिंग अ‍ॅप्स आधीच ब्लॉक केले होते.

( हेही वाचा : यंदाच्या पावसाळ्यात १७ दिवस भरतीचे )

सुरक्षेच्या कारणास्तव थर्ड पार्टी रेकॉर्डिंग अ‍ॅप्स बंद केले जाणार आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे कॉल रेकॉर्डिंग अ‍ॅप्स ग्राहकांकडून अनेक प्रकारच्या परवानग्या घेतात. यामुळे युजर्सची वैयक्तिक माहिती उघड होऊ शकते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.