- ऋजुता लुकतुके
भारतीय शेअर बाजाराला आता उत्सुकता आहे ती आयटीसी हॉटेल्स या शेअरच्या स्वतंत्र नोंदणीची. हा शेअर आपली मुख्य कंपनी आयटीसीपासून वेगळा होणार आहे. तुमच्याकडे आधीपासून आयटीसीचे शेअर असतील तर तुम्हाला त्यावर आयटीसी हॉटेलचे शेअर मिळणार आहेत. पण, त्याचं नेमकं प्रमाण आणि आयटीसी हॉटेल्स कधी सूचीबद्ध होणार हे अजून ठरलेलं नाही. अर्थातच, या बातमीमुळे आयटीसी शेअवर या आठवड्याभरात सगळ्यांचंच लक्ष होतं. (ITC Share Price)
६ जानेवारीला डिमर्जरपूर्वी एक विशेष सत्र झालं आणि सकाळी ९ ते १० अशा एका तासात झालेल्या या सत्रात आयटीसीचा शेअर जवळ जवळ २६ रुपयांनी वाढला. आयटीसी शेअरची किंमत ठरवण्यासाठी हे सत्र पार पडलं. शुक्रवारी बाजार बंद होताना आयटीसीचा शेअर ४४३ रुपयांना बंद झाला आहे. (ITC Share Price)
(हेही वाचा – Congress : स्वबळाचा नारा काँग्रेसकडूनही? कार्यकर्त्यांचा आग्रह, वर्षा गायकवाडांचे संकेत)
आयटीसीचे शेअर ज्यांच्याकडे आहेत त्यांना आता आयटीसी हॉटेलचे शेअरही मिळणार आहेत. आटीसी हॉटेलचा शेअर २०० ते ३०० रुपयांच्या आसपास सूचीबद्ध होईल असा अंदाज आहे. या कंपनीचं बाजार मूल्यांकन ४२,००० ते ६०,००० कोटी रुपयांच्या दरम्यान असेल. नुवामा कंपनीने आयटीसी हॉटेलचं लिस्टिंग १५० ते १७५ रुपयांच्या दरम्यान होईल असं म्हटलं आहे. तर एसबीआय सेक्युरीटीजच्या म्हणण्यानुसार, लिस्टिंग ११३ ते ७० रुपयांच्या दरम्यान होऊ शकतं. (ITC Share Price)
महत्त्वाचं म्हणजे सध्या आयटीसी हा शेअर निफ्टी ५० आणि सेन्सेक्स ३० या शेअरचा एक भाग आहे. त्यामुळे हा शेअर स्वतंत्र झाल्यानंतरही तो निफ्टीचा ५१ वा शेअर तर सेन्सेक्सचा ३१ वा शेअर असले. विलिनीकरणाच्या नियमानुसार, ही सोय करण्यात आली आहे. आयटीसी कंपनीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन हॉटेल व्यवसायात कंपनीला करायच्या विस्तारांची नांदी दिली आहे. आता गुंतवणूकदारांचा कसा प्रतिसाद मिळतो हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (ITC Share Price)
(टिप – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. गुंतवणूकदारांनी स्वत:च्या जबाबदारीवर गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी-विक्रीवर सल्ला देत नाही)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community