चहाचा इतिहास खूप जुना असून साखर आणि गुळामधला वादसुद्धा कायमच दिसून येतो. (Jaggery Tea) दोन्हीचा वापर चहा गोड करण्यासाठी केला जात असला तरी, दोन्हीमध्ये निवड करणे आरोग्यसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. गूळ हा उसाच्या किंवा ताडाच्या रसापासून बनविलेला गोड पदार्थ आहे. (Jaggery Tea)
१. पौष्टिक स्वीटनर
गूळ नैसर्गिक आणि पौष्टिक स्वीटनर म्हणून ओळखला जातो. त्यात साखरेपेक्षा जास्त पोषकतत्त्वे असतात. त्यात लोह, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स सारखी खनिजे, इतर आवश्यक खनिजे असतात. दुसरीकडे साखरेमध्येही पोषकतत्त्वे खूप कमी प्रमाणात असतात; कारण ते रासायनिक प्रक्रिया करतांना निघून जातात. गुळातील मोलॅसेस, त्याला एक वेगळी चव देते आणि पांढर्या साखरेच्या तुलनेत किंचित कमी ग्लायसेमिक इंडेक्स देते. (Jaggery Tea)
(हेही वाचा – Maratha Reservation : बारामतीतच अजित पवारांवर ओढवली नामुष्की)
२. आरोग्य लाभ
चहामध्ये गुळाचा वापर केल्याने आरोग्याचे फायदे मिळतात, जे सफेद साखरेमध्ये मिळत नाही. असे मानले जाते की, गूळ पचनास मदत करतो, एक नैसर्गिक शुद्धीकरण एजंट म्हणून काम करतो, तर शुद्ध साखरेचे जास्त सेवन केल्याने लठ्ठपणा, टाइप 2 मधुमेह आणि दातांच्या समस्यांचा वाढता धोका यासह विविध आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. याव्यतिरिक्त गुळातील लोहाचे प्रमाण फायदेशीर ठरू शकते, विशेषत: अशक्तपणा किंवा लोहाची पातळी कमी असलेल्या लोकांसाठी !
३. चव आणि सुगंध
आरोग्याच्या व्यतिरिक्त चव आणि सुगंध ही गुळाची मूळ वैशिष्ट्ये आहेत. गूळ एक विशिष्ट, समृद्ध, कॅरमल सारखी चव देतो. साखरेला स्वतःची चव नसते. त्यामुळे चहात टाकल्यावर ती फक्त गोडवा देते. (Jaggery Tea)
४. परिपूर्ण चहा
गुळाच्या चहाची पारंपरिक प्रथा विविध संस्कृतींमध्ये शतकानुशतके प्रचलित आहे. आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेच्या बर्याच भागांमध्ये, साखरेचा वापर ना करता, गूळ हा चहा गोड करण्यासाठी निवडला जातो. आरोग्याविषयी जागरूकता जसजशी वाढत जाते, तसतसे अनेक चहाप्रेमी पर्याय म्हणून गुळाकडे वळत आहेत. (Jaggery Tea)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community