Jaguar Company Owner : जॅग्वार कार ब्रँडचे मालक कोण आहेत?

Jaguar Company Owner : रतन टाटा यांनी हा ब्रँड टाटा मोटर्सच्या छत्राखाली आणला.

34
Jaguar Company Owner : जॅग्वार कार ब्रँडचे मालक कोण आहेत?
  • ऋजुता लुकतुके

अमेरिकेचे कार उत्पादक हेन्री फोर्ड यांनी एकदा रतन टाटा यांना, ‘तुम्हाला कार कशी बनवायची हे कळत नाही,’ असं कुस्तितपणे सुनावलं होतं. परिस्थिती कशी फिरली बघा. २००८ च्या आर्थिक मंदीनंतर फोर्ड कंपनीलाच अमेरिकेत धंदा करणं अशक्य झालं आणि त्यांचे जॅग्वार, लँडरोव्हर हे इंग्लंडकडून विकत घेतलेले ब्रँड त्यांना त्याच रतन टाटांना विकावे लागले. ही कथा एव्हाना सगळ्यांनाच माहीत आहे. पण, जॅग्वार कंपनीचे मूळ मालक आणि टाटा मोटर्सकडे त्यांचा झालेला प्रवास इथे समजून घेऊया, (Jaguar Company Owner)

गाडीच्या पुढे झेप घेण्याच्या तयारीत असलेला चित्ता ही या ब्रँडची ओळख आहे आणि चित्त्याशीही स्पर्धा करू शकेल अशी स्पोर्ट्स कार असा त्याचा अर्थ आहे. विल्यम्स लायन आणि विल्यम्स वॉल्मस्ली यांनी १९२२ मध्ये एक कंपनी सुरू केली. त्यांना मोटरसायकलला शेजारी जोडता येतील अशा साईडकार बनवायच्या होत्या. मोटरसाटकलची आसन क्षमता त्यामुळे दोनने वाढणार होती. ही तेव्हाची अभिनव कल्पना होती. त्यामुळे तिला यशही मिळालं. स्वॅलो साईडकार कंपनी असंच तिचं नाव होतं. (Jaguar Company Owner)

(हेही वाचा – मुंबई-नाशिक महामार्गावरील Kasara Ghat पुढील ६ दिवस दोन टप्प्यात राहणार बंद)

पण, तिथून एका नवीन प्रवासाला सुरुवात झाली होती. दोघांनी मिळून १९३५ मध्ये पहिली प्रवासी कारही बाजारात आणली. आणि त्यावर हे आताचं प्रसिद्‌ध झेप घेणाऱ्या चित्त्याचं चित्र होतं. कारचं नाव होतं एसएस जॅग्वार १००. १९४५ मध्ये त्यांनी आपल्या कंपनीचं नाव बदलून जॅग्वार कार कंपनी असं केलं. कंपनीची एकेक मॉडेल बाजारात येत राहिली आणि तिची लोकप्रियताही वाढत गेली. लक्झरी स्पोर्ट्स कार म्हटलं की, जॅग्वार असं युकेमधील गणित तेव्हा होतं. १९७० मध्ये ब्रिटिश पंतप्रधान जॅग्वार कार वापरायला लागले. (Jaguar Company Owner)

मधल्या काळात कंपनीत स्थिंत्यतरं होतच होती आणि अखेर १९९० मध्ये अमेरिकन कंपनी फोर्डने जॅग्वारला विकत घेतलं. फोर्ड कंपनीला तेव्हा लक्झरी कार बाजारपेठेत उतरायचं होतं. २००० मध्ये फोर्ड यांनी लँडरोव्हर हा आणखी एक लक्झरी कार ब्रँड विकत घेतला आणि मग दोघांची मिळून एक कंपनी झाली जॅग्वार-लँडरोव्हर. पुढे मग २००८ मध्ये रतन टाटा यांच्या धोरणी नेतृत्वाखाली ही कंपनी टाटा मोटर्सचा भाग झाली. टाटांनी टाटा मोटर्सची उपकंपनी म्हणून जॅग्वार-लँडरोव्हर सुरू ठेवली आहे. इंग्लंडच्या कोव्हेंट्री प्रांतात व्हिटली इथं कंपनीचा डिझाईनिंग प्रकल्प आहे. इथेच स्वॉलो कंपनीची पहिली साईटकार बनली होती. तिथे आता जॅग्वार गाड्यांचं डिझीईन तयार होतं. तर वॉरविकशायरमध्ये गेडन इथं कंपनीचं अभियांत्रिकी काम चालतं. आणि कॅसल ब्रूमहिल, कॅलिहल इथं या गाडीची बांधणी पूर्ण होते. २०२१ मध्ये कंपनीने घोषणा केली आहे की, २०२५ पासून कंपनीच्या सर्व गाड्या या इलेक्ट्रिक प्रकारच्याच असतील. (Jaguar Company Owner)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.