बऱ्याचदा काही जणांकडून तुम्ही त्यांचे फेसबुक अकाऊंट ब्लॉक झाल्याचे ऐकले किंवा पाहिले असेल. आपल्या युजर्सचे अकाऊंट ब्लॉक करण्यामागे फेसबुकची वेगवेगळी कारणे असू शकतात. पण तुम्हाला माहिती आहे का फेसबुकला एका युजरचे अकाऊंट ब्लॉक करणे चांगलेच महागात पडले आहे. अकाऊंट ब्लॉक केलेल्या या युजरला फेसबुकला एक्केचाळीस लाख रुपये इतका मोबदला द्यावा लागला आहे. या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
भारतात दररोज फेसबुकच्या कंपनीकडून लाखो अकाऊंट्स ब्लॉक करण्यात येतात. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भारत सरकार तसे फेसबुकला आदेश देतात. तर काही अकाऊंट फेसबुकच्या पॉलिसीनुसार बंद होण्यास पात्र असतात. म्हणून त्यांना ब्लॉक केले जाते. पण ही घटना भारतातली नाही तर अमेरिकेतली आहे. अमेरिकेत राहणाऱ्या एका वकीलाचे अकाऊंट फेसबुकने ब्लॉक केले. त्या फेसबुक युजर वकीलाने फेसबुकला अकाऊंट ब्लॉक करण्याचे कारण विचारले असता फेसबुककडून कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने या वकीलाने फेसबुकच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. या वकीलाचे नाव जेसन क्रोफोर्ड असे आहे.
(हेही वाचा – International Yoga Day : महानगरपालिका मुख्यालयात चक्क दुपारी भरवले योग शिबिर)
गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये हे प्रकरण घडले. फेसबुकने जेसनच्या कोणत्याही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दिले नाही तेव्हा जेसनने फेसबुकविरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. जेसनचे म्हणणे होते की, फेसबुकने कोणत्याही कारणाशिवाय त्याचे अकाऊंट ब्लॉक केले होते. फेसबुकच्या विरोधात जेसनचा हा खटला वर्षभर चालल्यानंतर जेसनला आता न्याय मिळाला आहे. न्यायालयाने फेसबुकने जेसनला पन्नास हजार डॉलर एवढा मोबदला द्यावा. अशी शिक्षा ठोठावली आहे. म्हणजे जेसनला जवळपास एक्केचाळीस हजार रुपयांचा मोबदला फेसबुककडून मिळाला आहे.
रिपोर्टनुसार असे कळले की, ब्लॉक केल्यानंतर जेसनचा अकाऊंट फेसबुकने पुन्हा रिस्टोअर केला नाही तेव्हा जेसनने फेसबुकविरोधात न्यायालयात जाण्याचे ठरवले. फेसबुककडून युजर्सची तक्रार ऐकून घेण्यासाठी कोणताही एक्झिक्युटिव्ह नव्हता असे जेसनने कोर्टात सांगितले. अकाऊंट ब्लॉक केल्यामुळे त्याला आपली बाजू मांडता आली नाही असेही तो म्हणाला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community