जर तुम्हाला डोंगरमाथ्यावर असलेलं भव्य आणि प्रेक्षणीय मंदिर पाहायचं असेल तर जटोली शिव मंदिर हे अतिशय उत्तम ठिकाण आहे. जाटोली हे नाव महादेवांच्या लांब जटांपासून पडलं आहे. आशिया खंडातलं सर्वोच्च शिव मंदिर म्हणून ओळखलं जाणारं हे मंदिर खरोखरच स्थापत्यशास्त्राचा एक सर्वोत्कृष्ट नमुना आहे. जटोली शिव मंदिर हे सोलन इथल्या प्रसिद्ध तीर्थस्थळांपैकी एक आहे. या मंदिरात मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक भेट देतात. हे मंदिर शहरापासून फक्त ६ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. (jatoli shiv temple)
जटोली शिव मंदिराच्या इतिहासाशी संबंधित अनेक दंतकथा ऐकिवात आहेत. हे शिवमंदिर महादेवांच्या सर्वांत प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. असं मानलं जातं की, हे मंदिर एकेकाळी महादेवांचं विश्रामस्थान होतं. (jatoli shiv temple)
(हेही वाचा – महाराष्ट्र बांगलादेशी अन् रोहिंग्यामुक्त करायचा आहे; Nitesh Rane)
हे मंदिर विशिष्ट दक्षिण-द्रविड शैलीतल्या वास्तुकलेनुसार बनवलेलं आहे. हे मंदिर सलग तीन पिरॅमिडने बनलेलं आहे. पहिल्या पिरॅमिडवर गणपतीची मूर्ती आहे आणि दुसऱ्या पिरॅमिडवर शेष नागाचं शिल्प आहे. आशिया खंडातलं सर्वोच्च मंदिराचा मान जटोली शिवमंदिराला मिळाला आहे. या मंदिराचं बांधकाम पूर्ण होण्यासाठी ३९ वर्षं एवढा कालावधी लागला. (jatoli shiv temple)
या मंदिराच्या मंदिराच्या ईशान्य कोपऱ्यावर एक ‘जलकुंड’ आहे. हे जलकुंड गंगा नदीसारखं पवित्र मानलं जातं. या कुंडाच्या पाण्यात अनेक औषधी गुण आहेत. या कुंडात स्नान केल्याने अनेक त्वचेच्या आजारांवर आपसूकच उपचार होतात. मंदिराच्या आत एक गुहा आहे. या गुहेमध्ये स्वामी कृष्णानंद परमहंस यांचं वास्तव्य होतं. या शिव मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या निमित्ताने इथे मोठी जत्रा भरते. या मंदिरात अनेक भाविक भक्त मनोभावे महादेवांना शरण जाण्यासाठी जमतात. (jatoli shiv temple)
(हेही वाचा – chapora fort : चापोरा किल्ला प्रसिद्ध का आहे, माहिती आहे का?)
१९५० साली स्वामी कृष्णानंद परमहंस जटोली इथे वास्तव्यासाठी गेले होते. या मंदिराची स्थापना श्री श्री १००८ स्वामी कृष्णानंद परमहंस महाराज यांनी १९७३ साली केली होती. या मंदिराच्या बांधकामाला १९७४ साली सुरुवात झाली होती. पुढे १९८३ साली श्री स्वामी कृष्णानंद परमहंस महाराज ब्रह्मलीन झाले. स्वामी कृष्णानंद यांनी समाधी घेतल्यानंतर मंदिर व्यवस्थापन समितीने मंदिराचं बांधकाम सुरूच ठेवलं. (jatoli shiv temple)
या मंदिरावर ११ फूट उंच सोन्याचा कलश चढवला गेला आहे. त्यामुळे मंदिराची उंची १२२ फूट एवढी उंच झाली आहे. हे उत्तर भारतातलं सर्वांत उंच मंदिर असल्याचा दावा मंदिर व्यवस्थापन समितीने केला आहे. हे भव्य शिवमंदिर जटोलीच्या सुंदर खोऱ्यांमध्ये वसलेलं आहे. (jatoli shiv temple)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community