…तो हबीब महिलेचे केस कापताना कायम थुंकायचा!

सोशल मिडियावर सध्या हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब याचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल होत आहे. महिलेच्या केसांवर थुंकल्याप्रकरणी हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान जावेद हबीब महिला ब्युटीशियनच्या केसावर थुंकले, हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या घटनेनंतर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून हिंदू संघटनांनी जावेद हबीबवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

( हेही वाचा : मोठी बातमी! ओबीसी आरक्षणला सर्वोच्च न्यायालयाची मंजूरी )

राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल 

ही महिला बागपतमधील बरौत येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. जावेद हबीब यांनी केसात थुंकून त्यांचा जाहीर अपमान केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानेही दखल घेतली आहे. आयोगाने उत्तर प्रदेश पोलिसांना जावेद हबीबच्या थुंकण्याच्या व्हिडिओची सत्यता तपासण्यास सांगितले आहे. ही घटना केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या कोविड मार्गदर्शक तत्त्वांचेही उल्लंघन करणारी आहे आणि अशा परिस्थितीत लोकांमध्ये थुंकणे हा दंडनीय गुन्हा आहे. असे महिला आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच आयोगाने जावेद हबीबला नोटीस पाठवली आहे.

राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगानेही जावेद हबीब यांना नोटीस पाठवण्याची तयारी केली आहे. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने दिल्लीचे पोलिस आयुक्त राकेश अस्थाना आणि उत्तर प्रदेशचे डीजीपी मुकुल गोयल यांना पत्र लिहून व्हिडिओची सत्यता समजल्यानंतर याप्रकरणी तातडीने कारवाई करण्यास सांगितले आहे. आयोगाने ही घटना अत्यंत गांभीर्याने घेतली असून त्याचा तीव्र शब्दात निषेधही केला आहे. दिल्ली पोलिस आयुक्त आणि उत्तर प्रदेश डीजीपी यांनाही लवकरात लवकर कारवाईचा अहवाल सादर करण्यास सांगितले.

व्हिडिओ व्हायरल

या व्हिडिओमध्ये जावेद हबीब एका सेमिनार दरम्यान महिलेच्या केसांवर थुंकताना दिसत आहे ‘जेव्हा पाण्याची कमतरता असेल तेव्हा थुंकी वापरा’, असा असभ्य संदेश जावेद हबीब उपस्थित लोकांना देत आहे. यानंतर महिलेचा एक व्हिडिओही समोर आला आहे ज्यामध्ये ती म्हणाली, ‘मी जावेद हबीबच्या वर्कशॉपला गेले होते, त्यांनी केस कापण्यासाठी स्वत: मला स्टेजवर बोलावले. त्यानंतर त्याने हे कृत्य केले. आता मी रस्त्याच्या कडेला केस कापून घेईन, पण हबीबकडे जाणार नाही.’ असे स्पष्टीकरण महिलेने दिले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here