जिऱ्याचं पाणी प्यायल्याने शरीरात अन्नाचं विघटन करणाऱ्या एंजाइम्सचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे शरीराला पुढील पाच फायदे मिळतात. (jeera water benefits)
पचनक्रिया सुधारते
जर तुम्हाला तुमचं अतिरिक्त वजन कमी करायचं असेल तर, जिऱ्याचं पाणी हे तुमचा दिवस सुरु करण्यासाठी सर्वोत्तम पेय आहे. हे पाणी नियमितपणे प्यायल्याने शरीरात पाचक एंजाइम्सचं प्रमाण वाढतं. त्यामुळे अन्न पचण्यास मदत होते. पोटफुगीची समस्या किंवा अस्वस्थता होत नाही.
चयापचय प्रक्रिया वाढवते
जिऱ्याच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने तुमची चयापचय प्रक्रिया वाढते. त्यामुळे दिवसभर उर्जावान राहत येतं.
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते
जिऱ्याच्या पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे आपलं शरीर संक्रमणांशी लढायला तयार असतं. म्हणून आजारी पडण्याची शक्यता खूप कमी होते. (jeera water benefits)
त्वचेचं आरोग्य सुधारतं
जिऱ्याचं पाणी हे त्वचेचं आरोग्य सुधारण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. कारण त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स मुक्त रॅडिकल्सची क्रिया रोखतात आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे तुमचा चेहरा उजळण्यास मदत होते.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते
जिऱ्याचं पाणी हे मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. कारण जिऱ्याच्या पाण्यामुळे रक्तातली ग्लुकोजची पातळी संतुलित राहण्यास मदत होते. जिऱ्याचं पाणी हे इन्सुलिन स्पाइक्स नियंत्रित करतं. (jeera water benefits)
(हेही वाचा – Shardul Thakur : मुंबईकर तेज गोलंदाज शार्दूल ठाकूर एसेक्स काऊंटीकडून खेळणार)
जिऱ्याचं पाणी कसं तयार करावं?
जिऱ्याचं पाणी तयार करण्यासाठी खाली दिलेल्या काही सोप्या स्टेप्स फॉलो करा..
- १ टेबलस्पून जिरं घ्या आणि ते २ कप पाण्यात रात्रभर किंवा कमीतकमी ५ ते ६ तास भिजत ठेवा. यामुळे जिरे फुगते आणि त्यांतली शरीरासाठी उपयुक्त असलेली संयुगे पाण्यात मिसळतात.
- त्यानंतर हे मिश्रण तापवण्यासाठी एका भांड्यात ओतून घ्या.
- ते पाणी गॅसवर ठेऊन सुमारे ५ मिनिटे चांगलं उकळू द्या. या प्रक्रियेमुळे जिऱ्यामधले आवश्यक आणि पोषक घटक जास्त प्रमाणात बाहेर पडण्यास मदत होते.
- पाणी व्यवस्थित उकळल्यानंतर बारीक जाळीदार गाळणीचा वापर करून ते पाणी गाळून घ्या.
- हे तयार झालेलं जिऱ्याचं पाणी एका ग्लासमध्ये सर्व्ह करा.
- पाण्याला गोडवा आणण्यासाठी त्यात एक चमचा मध घालू शकता. तसंच पाण्याची चव वाढविण्यासाठी लिंबाचा रस आणि चिमूटभर मीठही घालू शकता.
जिऱ्याचं पाणी पिण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?
शरीराला जास्तीत जास्त फायदा व्हावा म्हणून सकाळी अनशा पोटी जिऱ्याचं पाणी घ्यावं. तुम्ही दिवसभर ते डिटॉक्सिफायिंग, हायड्रेटिंग आणि आरोग्यदायी पेय म्हणून देखील पिऊ शकता. तसंच जेवणाआधी तुम्ही ते २० ते ३० मिनिटे अगोदरही पिऊ शकता. जेवणाआधी जिऱ्याचं पाणी प्यायल्याने अन्नपचन होण्यास मदत होते. (jeera water benefits)
(हेही वाचा – PVR-INOX ने जाहिराती दाखवून वेळ फुकट घालवल्याबद्दल खटला केला दाखल ; न्यायालयाने काय म्हटले?)
जिऱ्याच्या पाण्याचे दुष्परिणाम
जिऱ्याच्या पाण्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळत असले तरीही, त्याच्या सेवनामुळे काही संभाव्य दुष्परिणामही होऊ शकतात. त्याबद्दल जागरूक असणे गरजेचे आहे. जिऱ्याच्या पाण्याचे काही दुष्परिणाम खाली दिलेले आहेत..
- हायपोग्लायसेमिया : जिऱ्याच्या पाण्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते. मधुमेह असलेल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात जिऱ्याचं पाणी प्यायल्याने हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. ही अशी स्थिती असते ज्यामध्ये रक्तातली साखरेची पातळी अतिशय कमी होते.
- वंध्यत्वाची समस्या : संशोधकांना असं आढळून आले आहे की जिऱ्याच्या पाण्यामुळे टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते. त्यामुळे पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता कमी होऊ शकते.
- गर्भधारणेची चिंता : गर्भधारणेदरम्यान जिऱ्याचं पाणी पिण्याची शिफारस केली जात नाही. गर्भवती महिलांनी जिऱ्याचे पाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण जास्त प्रमाणात ते सेवन केल्याने गरोदरपणात काही कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community