- ऋजुता लुकतुके
जिओ कॉईनच्या नावात कॉईन म्हणजे चलन असलं तरी हे पारंपरिक दृष्ट्या वापरात असलेल्या चलनासारखं नाही. ब्लॉकचेनवर आधारित इथेरिअम २ वर आधारित जिओ कॉईन रिलायन्स जिओनं पॉलिगॉन लॅब्जच्या सहकार्याने बनवलं आहे आणि जिओच्या ग्राहकांना ते मोफत मिळतं. ते पूर्णपणे चलनासारखं वापरता येत नाही. पण, ही कॉईन असतील तर तुम्हाला त्यावर रिलायन्स समुहात सवलती मिळू शकतात. (Jio Coin)
(हेही वाचा – Google Map ने चुकीचा रस्ता दाखवला आणि UPSC चे २० ते २५ विद्यार्थी परीक्षेपासून राहिले वंचित)
जिओ कॉईन हे इतर क्रिप्टो चलनासारखं नाही, कारण, तुम्ही ते विकत घेऊ शकत नाही. किंवा त्यात ट्रेडिंगही करू शकत नाही. इतर क्रिप्टोचलनांसारखं ते एक्सचेंजवर उपलब्ध नाही किंवा ते तिथे ट्रेडही होत नाही आणि त्यात ट्रेडिंग होत नसल्यामुळे या चलनाला बाजारमूल्यही नाही. इथेरिअम तंत्रज्ञान वापरून हे कॉईन बनवलं आहे. भारतीय चलनांवर एक वाक्य लिहिलेलं असतं. ‘या नाण्याच्या/नोटेच्या धारकाला-मूल्य प्रदान करण्याचं वचन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर देत आहेत.’ जिओ कॉईन तुम्हाला जिओच्या काही सेवा वापरल्यावर मोफत मिळतात आणि निर्माती जिओ कंपनी तुम्हाला या कॉईनच्या बदल्यात मूल्य देत नसली तरी काही हमी नक्की देतात. ही हमी रिलायन्सने दिलेली आहे. (Jio Coin)
(हेही वाचा – Joshi’s Museum of Miniature Railway : पुण्यामध्ये आहे जोशींचे लघु रेल्वे संग्रहालय; भारतातील एकमेव रेल्वे मॉडलिंग म्युझियम)
रिलायन्स जिओचा एकप्रकारे हा रिवॉर्ड प्रोग्राम आहे. सध्या जिओ स्फिअर्स वेब ॲपवर तुम्हाला जिओ कॉईन मिळू शकतात. हळू हळू मायजिओ, जिओ सिनेमा तसंच जिओमार्ट या ॲपवरही सक्रिय ग्राहकांना हे कॉईन मिळू शकेल आणि या कॉईनच्या मोबदल्यात रिलायन्स जिओ कंपनी ग्राहकांना काही सेवा देऊ करेल. किंवा एखादी सेवा विशेष दरातही देऊ शकते. जिओ कॉईन मिळवण्यासाठी ग्राहकांना जिओस्पिअर्स ॲपवर लॉग-इन करावं लागेल आणि आणि तिथे जिओ कॉईन्स कार्यक्रमासाठी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. एकदा नोंदणी झाल्यानंतर जिओ स्फिअर ॲप तुम्ही वापरलात की, तुमच्या खात्यात जिओ कॉईन जमा होत जातील. ती वापरायची कशी हे रिलायन्स जिओ कंपनीच्या त्याविषयीच्या धोरणावर अवलंबून असेल. (Jio Coin)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community