Jio Financial Services Share Price : मुकेश अंबानींची जिओ कंपनी सुरू करणार डिजिटल कर्ज सेवा; शेअरमध्ये ४ टक्क्यांची उसळी

Jio Financial Share Price : शुक्रवारी या शेअरवर बातमीचा सकारात्मक परिणाम झाला आहे.

46
Jio Financial Services Share Price : मुकेश अंबानींची जिओ कंपनी सुरू करणार डिजिटल कर्ज सेवा; शेअरमध्ये ४ टक्क्यांची उसळी
  • ऋजुता लुकतुके

रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी एका वर्षापूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमधून जिओ फायनान्स शेअर वेगळा केला. यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर वाजवी किमतीत गुंतवणूकदारांना उपलब्घ झाला ही एक गोष्ट. तर जिओ फायनान्सचा विस्तार आणि त्यासाठी पैसा जोडणं हे शेअर बाजाराच्या माध्यमातून कंपनीसाठी शक्य झालं. ही कंपनी वेगळी झाल्यापासून रिलायन्सने विविध योजना कंपनीच्या माध्यमातून जारी केल्या आहेत. शुक्रवारी जाहीर झालेली डिजिटल किंवा ऑनलाईन कर्ज योजना ही त्यातीलच एक. या योजनेमुळे तुम्हाला घर बसल्या १० मिनिटांच्या आत अगदी १ कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज मिळू शकणार आहे. त्यासाठी तुम्हाला तारण म्हणून तुमची काही मालमत्ता ठेवावी लागेल. त्या बदल्यात हे कर्ज मिळणार आहे. या बातमीचा अत्यंत सकारात्मक परिणाम लगेचच शेअरवर दिसून आला आहे. (Jio Financial Services Share Price)

शुक्रवारी बाजार बंद होताना जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचा शेअऱ तब्बल सव्वा चार टक्क्यांनी चढून २३० रुपयांवर बंद झाला. एकूणच या महिनाभरात या शेअरमध्ये १२ अंशांची किंवा ६ टक्क्यांची वाढ झाली आहे. (Jio Financial Services Share Price)

(हेही वाचा – Smartphone Export : भारतातून विक्रमी २ लाख कोटी रुपयांचे स्मार्टफोन निर्यात)

New Project 2025 04 12T175213.687

अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अलीकडेच जिओ फायनान्स कंपनीच्या गृह कर्ज योजनेविषयी सुतोवाच केलं होतं. फक्त गृहकर्जच नाही तर मालमत्तेच्या बदल्यात तारण कर्ज आणि सुरक्षित कर्ज योजनाही कंपनी सुरू करणार आहे. सध्या हा शेअर आपल्या वार्षिक सर्वोच्च पातळी ३९४ रुपयांच्या जवळ जवळ ५५ टक्के खाली आहे. येणारे दिवस या शेअरसाठी महत्त्वाचे असणार आहेत. (Jio Financial Services Share Price)

जिओ फायनान्स कंपनीला अलीकडेच रिझर्व्ह बँकेकडून गुंतवणूक बँक म्हणून परवानगी मिळाली आहे. कंपनीने आपली गृहकर्ज योजना बिटा स्वरुपात पूर्वीच लाँच केली आहे. आता मोठ्या प्रमाणातील रोलआऊट साठी कंपनी तयार आहे. त्याचबरोबर ही बँकेतर वित्तीय संस्था विविध प्रकारची सुरक्षित कर्जही लोकांसाठी आणणार आहे. (Jio Financial Services Share Price)

रिलायन्स समुहातील कंपनी कर्जाच्या क्षेत्रात उतरत असल्यामुळे इतर बँका आणि वित्तीय संस्थांसमोरचं आव्हान नक्कीच वाढलं आहे. या बातमीमुळे शेअर बाजारातही हलचल वाढली आहे. हा शेअऱ रिलायन्सपासून वेगळा होऊन एकच वर्ष झाल्यामुळे अजून जागतिक संशोधन संस्थांनी या शेअरवर तांत्रिक अभ्यास सुरू केलेला नाही. (Jio Financial Services Share Price)

(डिस्क्लेमर : शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. गुंतवणूकदारांनी आपल्या जोखमीवर ही गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी आणि विक्रीवर कुठलाही सल्ला देत नाही.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.