मुंबईकरांनो गाडीत बसून भव्यस्क्रिनवर चित्रपट पाहण्यासाठी सज्ज व्हा !

123

कोरोना काळात सिनेमाहॉल, नाट्यगृहांवर निर्बंध घालण्यात आले होते. पण सरकारने निर्बंध शिथिल केल्यावर प्रेक्षकांना पुन्हा एकदा सिनेमाकडे आकर्षित करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजने अनोखी योजना केली आहे. रिसायन्सचे पहिले ओपन-एअर रूफटॉप थिएटर मुंबईकरांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहे. हे थिएटर ‘जिओ ड्राइव्ह-इन’ या नावाने ओळखले जाईल. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरात असलेल्या जिओ वर्ल्ड ड्राईव्ह येथे ५ नोव्हेंबरला हे ओपन एअर थिएटर सुरु झाले आहे.

असं असणार ओपन एअर थिएटर 

१. प्रत्येक कारच्या तिकिटाची किंमत सुमारे १२०० रुपये इतकी ठेवण्यात आली आहे आणि एका गाडीत फक्त चार जणांना परवानगी असणार आहे.
२. जिओ ड्राइव्ह-इनने 24m x 10m परिमाणांसह देशातील सर्वात मोठ्या सिनेमा स्क्रीन्सपैकी एक असल्याचा दावा केला आहे.
३. अद्वितीय थिएटर क्रिस्टी आरजीबी लेझर प्रोजेक्शनद्वारे समर्थित आहे. हे कारच्या ध्वनी प्रणालीद्वारे FM सिग्नलवर साउंडट्रॅक प्रसारित करून आवाज वाढवते.
४. ज्यांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे आणि दुसऱ्या लसीनंतर चौदा दिवसांचा कालावधी संपला आहे अशा लोकांना मॉल कॉम्प्लेक्समध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
५. जिओ ड्राईव्ह इनमध्ये २९० कारची क्षमता आहे.

नऊ खाद्यसंस्कृतींचा अनुभव

लवकरच जिओ वर्ल्ड ड्राईव्ह येथे नाईन डाईन हे एक मल्टी-क्युझिन कॅज्युअल-डाइन लाँच होणार आहे. जे जागतिक पातळीवरील नऊ खाद्यसंस्कृतींचा एकत्रित अनुभव देईल. म्हणजेच कारमध्ये बसल्या जागी तुम्हाला मनपसंत रूचकर जेवणाचाही अनुभव घेण्याची संधी देखील मिळू शकते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.